Ticker

6/recent/ticker-posts

*सोनियाजी गांधींशी गैरवर्तन करणाऱ्या स्मृती इराणी माफी मागा : संध्या सव्वालाखे* *केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणुतील घरावर महिला काँग्रेसची धडक*




जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई, दि. ३१ जुलै: काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मर्यादा ओलांडली आहे. देशासाठी दोन महान व्यक्तींचे बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबातील सोनियाजी यांनी पंतप्रधानपदाचाही त्याग करून राजकारणात एक आदर्श घालून दिलेला आहे. विरोध पक्षातील लोकांशीही त्या आदराने वागतात. अशा आदरणीय सोनियांजी यांच्याशी गैरवर्तन करून स्मृती इराणी यांनी त्यांची ‘संस्कृती’ दाखवून दिली आहे. इराणी यांनी सोनियाजी यांची माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, इशारा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिला आहे.

महिला काँग्रेसने प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या डहाणू येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
संध्याताई सव्वालाखे पुढे म्हणाल्या की, स्मृती इराणी यांची १८ वर्षांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवते. त्याविरोधात काँग्रेसने जाब विचारल्याने स्मृती इराणी यांना झोंबले, त्याचा राग धरून त्यांनी सोनियाजींशी संसद परिसरात हुज्जत घातली. सोनियाजी या ७५ वर्षांच्या राजकीय श्रेत्रातील आदरणीय नेत्या आहेत. लोकशाहीत सरकारला जाब विचारण्याचा विरोधकांना संविधानाने हक्क दिला आहे पण सरकारला कोंडीत पकडत असल्याने व स्मृती इराणींच्या मुलीचे अवैध कारनामे बाहेर काढल्याने स्मृती इराणी यांनी असभ्य वर्तन केले. आमच्या नेत्यांचा अपमान कराल तर सहन केले जाणार नाही, त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सव्वालाखे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments