Ticker

6/recent/ticker-posts

तेलंगणा राज्यत हैदराबाद येथे बुडून मरण पावलेल्या दोघांवर पोंभुर्णात अंत्यसंस्कार



पोंभुर्णा प्रतिनिधी
       येथील दोन युवक नामे हिवराज मनोहर जिलेवार वय वर्षे 27, व विनायक विठ्ठल ईप्पलवार वय वर्षे 34, हे आपल्या कुटुंबाच्या गाडा चालविण्याकरिता व आपल्या पोटाची खळगी भरण्याचा करिता रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात महिनाभरापूर्वी गेले होते. हैदराबाद येथे त्यांना कामही मिळाले. काम करून दोघेही आनंदात असताना, काळाच्या मनात मात्र काही वेगळेच होते. सहा जून रोजी दोघेही शौच विधी साठी बाहेर असलेल्या शेततळ्यावर गेले. त्या ठिकाणी शेततळ्यात हिवराजचा पाय घसरला व तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला ,जवळच असलेल्या विनायक ने हे दृश्य बघताच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला.मात्र पाणी खोल असल्यामुळे एकामेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात या दोघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
       या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पोंभुर्णा शहरात येऊन धडकली, ही माहिती शहरात पसरताच शहर काही काळ स्तब्धच झाले. त्या दोघांवरही आज पोंभुर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जनवार्ता भारत डॉट कॉम कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

1 Comments

भावपूर्ण श्रद्धांजली