Ticker

6/recent/ticker-posts

*💥सोलापुरात भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन चिमुकल्यांचाही समावेश, तीन जखमी

 
जनवार्भातारत डॉट कॉम
 
सोलापूर : मोहोळकडून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या स्कॉर्पिओची आणि पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने निघालेल्या सेलेरिओ कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्यासह दोन कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला. पेनूर परिसरातील माळी पाटीजवळ रविवारी दुपारी ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 इरफान नूरखान खान (४०), बेनजीर इरफान खान (३७), डॉ. मुजाहिद इमामुद्दिन आत्तार (३७), डॉ. आफ्रीन मुजाहिद आत्तार (२७), इनामा इरफान खान (२) आणि अराफत मुजाहिद आत्तार (५) सर्व रा.मोहोळ अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अरहान इरफान खान (७), स्कॉर्पिओचा चालक अनिल सुभाष हुंडेकरी आणि मनीषा मोहन हुंडेकरी हे जी असून त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून मोहोळ-पंढरपूर-आळंदी या महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सहापदरी मार्गाचे काम सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी महामार्ग अपूर्ण असूनही योग्य त्या दिशेने दिशादर्शक फलक न लावता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. भिन्न दिशेने भरधाव वेगाने येणारी ही दोन वाहने पेनूरजवळ आली असता दोन्ही चालकांची संभ्रमावस्था होऊन एकमेकांवर प्रचंड वेगात आदळली.
 
या अपघातात सेलेरिओ गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनीही पेनूर येथील अपघाताच्या घटना स्थळाला भेट देऊन या अपघाताची माहिती घेतली. याशिवाय महामार्ग पोलीस पथकदेखील मोहोळ शहरात अनेक महिन्यांनंतर दाखल झाले होते.

Post a Comment

0 Comments