Ticker

6/recent/ticker-posts

*पावसाळ्यापुर्वी रस्ते दुरूस्ती व नाले सफाई पुर्ण करा अन्यथा वेळप्रसंगी शिवसैनिक नाले सफाईसाठी नाल्यात उतरेल व मुख्य रस्ते दुरुस्ती शिवसेना करेल : उदय जाधव*



 *पावसाळ्यापुर्वी रस्ते दुरूस्ती व नाले सफाई पुर्ण करा अन्यथा वेळप्रसंगी शिवसैनिक नाले सफाईसाठी नाल्यात उतरेल व मुख्य रस्ते दुरुस्ती शिवसेना करेल : उदय जाधव*
   
*महानगरपालिका आयुक्तांना दिले शिवसेनेने निवेदन*

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विरार: उन्हाळ्याच्या गर्मीने त्रासलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेला दिसतो परंतु ह्याच पावसाचे दुसरे रुद्र रूप, म्हणजेच अतिवृष्टीच्या दरम्यानचा होणारा त्रास प्रत्येक नागरिकाच्या मनात भीती करून जातो. ह्या भितीच्या खऱ्या कारणामागे कुठेतरी महानगरपालिका देखील जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांकडून आता ऐकायला मिळत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून देखील मनपाकडून पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाई व रस्ते दुरुस्तीचे कामे संत गती असल्याने त्याचा फटका प्रत्येक वेळी विरार शहरातील करदात्या नागरिकांना बसला आहे. नालेसफाई योग्य वेळेत झाली नसल्याने महानगरपालिकेच्या चुकीमुळे नागरीकांना पुर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या पाण्याला नाल्यातून वाहण्यास प्रवाह मिळत नसल्याने प्रवाहाला मिळेल तिथून वाट काढत नाल्याचे पाणी वाहत असल्याने अनेक वेळा घाण कचरा घरात घुसत असल्याने मोठी रोगराई पसरत असते तसेच गुरे, कुत्री वाहून जात असल्याचे अनेक प्रकार विरार शहरातील कारगिलनगर, मनवेलपाडा, कोकण नगर अशा विविध भागात पावसाळ्या दरम्यान घडत असतात. त्याचप्रमाणे रस्त्याची पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती झाली नसल्याने व मनपाकडून नेमलेले कॉन्ट्रॅक्टर द्वारे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामकाजामुळे पावसाळ्याच्या एक दोन पावसातच प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत असतात. या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत. अशा पावसाळ्यापूर्वीच्या महत्त्वाच्या विषयांवर कानाडोळा करणाऱ्या मनपाच्या अधिकार्यांना विरारचे शिवसेना उपशहरप्रमुख श्री.उदय जाधव यांच्याकडून पत्रव्यवहार होऊन देखील मनपा कोणतीही दखल घेत नसल्याने यावेळी देखील विरार शहर पावसाच्या पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मागील वर्षी कारगिल नगर भागातील जयदीप शाळेच्या शेजारी असलेल्या नाल्याची भिंत पावसाच्या पाण्याने वाहुन गेल्याने आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झालेला असताना महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून देखील त्या विषयाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे विरार उपशहरप्रमुख श्री.उदय जाधव यांनी स्वखर्चाने नाल्याची सुरक्षा भिंत उभारली होती व नागरिकांना दिलासा दिला तसेच येणाऱ्या पावसात नालेसफाई व रस्ते दुरुस्ती यामुळे कोणताही अतिप्रसंग घडल्यास पूर्णपणे मनपा जबाबदार राहिल व वेळप्रसंगी मनपाच्या निषेधार्थ विरार शहरातील मनवेलपाडा विभागात शिवसेना स्वता: प्रमुख रस्ते दुरुस्ती करेल व वेळप्रसंगी नाल्यात उतरून शिवसैनिक नालेसफाई करण्यास तत्पर असेल असे ठामपणे बजावण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments