Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज वीज कोसळून 20 बकऱ्या ठार, पशुपालक थोडक्यात बचावला

ब्रेकिंग न्यूज
वीज कोसळून 20 बकऱ्या ठार, पशुपालक थोडक्यात बचावला
चंद्रपूर प्रतिनिधी
      जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला असतानाच आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली व विजांच्या कडकडाटाने राजुरा परिसर हादरवून सोडला. सायंकाळी पाच वाजता के सुमारास विजांच्या कडकडाट होऊन बकऱ्यांच्या कळपावर वीज कोसळली आणि या घटनेत वीस बकऱ्या ठार झाल्या नशीब बलवत्तर म्हणून पशुपालक थोडक्यात बचावला. ही घटना काल सायंकाळी दिनांक 21 एप्रिल रोजी राजुरा तालुक्यातील सोंडो या गावी घडली...... सविस्तर वृत्त असे की सोनई येथील वासुदेव जिटापेनवार हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव बकऱ्या चारायला शेतशिवारात गेला असता घरी परत येण्याच्या वेळेतच विजेचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक बकऱ्यांच्या कळपावर वीज कोसळली पशुपालकांच्या समोरच एका क्षणात वीस बकऱ्या या दुर्घटनेत ठार झाल्या. मात्र पशुपालक हा नशीबवान ठरला आणि या संकटातून तो सुखरूप बाहेर निघाला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी लोकांचा जमाव झाला महसूल व पोलिस विभागाला स्थानिक पोलिस पाटलांनी याची माहिती दिली दरम्यान या घटनेत त्या गरीब पशुपालकांची अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी पंचायत समिती माजी उपसभापती मंगेश गुरनुले यांनी महसूल अधिकाऱ्यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments