Ticker

6/recent/ticker-posts

*आम आदमी पार्टीच्या वतीने चामोर्शी येथे पेट्रोल डिझेल घरगुती गॅस, इंधन दर वाढीचा विरोद्धात छेडले भोंगा आन्दोलण*

*आम आदमी पार्टीच्या वतीने चामोर्शी येथे पेट्रोल डिझेल घरगुती गॅस, इंधन दर वाढीचा विरोद्धात छेडले भोंगा आन्दोलण*




*गुरुवार दि.२१/०४/२०२२*

  चामोर्शी:-सुखसागर एम झाडे

        आज आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंप तसेच गॅस एजन्सी च्या समोर इंधन दर वाढीच्या विरोद्धात आंदोलन करण्यात आले. देशात पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्याबरोबर पेट्रोल, डिझेल व गैस च्या किमती प्रचंड प्रमाणात वाढविल्यात. जेंव्हा की मोदी सरकार म्हणते पेट्रोल-डीझेल भाववाढ आमच्या हातात नसून आंतर-राष्ट्रीय बाजारातील क्रुडऑइलच्या भावावर आधारित आहे. असे असतांना पाच राज्याच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार कडून पेट्रोल चे रेट @१०/ कमी करणे आणि पूर्ण निवडणूक होईपर्यंत इंधन दर वाढ न होणे, परंतु निवडणुका पार पडल्याबरोबर @१००/ रुपयाचे पेट्रोल चे दर १०-१२ दिवसात १२०/ परंतु वाढविणे म्हणजे काय?

     एकूणच जेंव्हा इंधन दर वाढ होते तेव्हां दळणवळण महागते आणि त्यामुळे बाजारातील सर्वच वस्तुचे भाव वाढ म्हणजे महागाई वाढते, ज्याचे चटके केवळ गोरगरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना सहन करावे लागतात.

सन २०१४ पूर्वी पेट्रोल-डीझेल किंवा lpg च्या भावात २०-२५ पैसे वाढले तरी बीजेपी रस्त्यावर आन्दोलण करायची, परंतु आता ते सत्तेवर आल्यापासून दररोज भाव वाढ होते, जेंव्हा की १० वर्षांपूर्वी पेक्षा आता क्रूड ओईल चे भाव कमी झाले आहेत. मधल्या काळात तर अगदी खालच्या स्तरावर म्हणजे ३०-३५ डॉलर @ बॅरल पर्यंत क्रुडऑइलचे दर घसरले होते, तरीही भारतात पेट्रोल-डीझेल- गैस सिलेंडर चे भाव त्याप्रमाणात कमी करण्यात आले नाहीत. उलट मोठ्याप्रमाणात भाव वाढ करण्यात आली.
आज पेट्रोल 121, डिझेल 105 तर गॅस  सिलेंडर 1001 च्या वर पोहचले आहे.
गोरगरीब जनता तर गॅस बंद करुन चुलीवर स्वयंपाक करायला भाग पाडाले आहे. याचा कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे म्हणून आज आम आदमी पार्टी शाखा चामोर्शी कडून महागाई विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले. जेणे करून मोदी सरकार ला गोरगरीब जनतेचा आवाज पोहचेल.

आज प्रामुख्याने, प्लेकार्ड च्या माध्यमातून पेट्रोल-डीझेल- गैस सिलेंडर च्या मूळ किमतीवर केंद्र व राज्य सरकार किती कर आकारणी करीत आहे, याचे आकडे, तसेच २०१४ पूर्वी मोदीजी जे इंधन दर वाढ विरोधात भाषण देत होते तसेच निवडणुकी नंतर सुद्धा पेट्रोल-डीझेल-गैस सिलेंडर चे भाव कमी झालेत की नाही असे भाषणबाजी करीत होते त्या भाषणाच्या क्लिप भोंग्यावरून वाजविण्यात आल्यात.  महागाई व सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी महागाई चे चॉकलेट वाटप करण्यात आलेत.

मा मोदिजींना पेट्रोल-डीझेल ला केंव्हा GST मध्ये आणणार हा ही प्रश्न करण्यात आला आहे. कारण जो पर्यंत GST मध्ये आणले जाणार नाही तो पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार जनतेची लुट करीत राहील, यामध्ये कुठेही शंका नाही. त्यामुळे इंधन दर वाढीबाबत आता मोदीजी का बोलत नाहीत, स्मृती इराणी का आंदोलन करीत नाहीत, मोदीजी महागाईवर आपण बुलडोजर का चालवीत नाही, अशा विविध प्रश्न आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेत. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुखसागर एम झाडे, युवा संघटक धनराज कुसराम, प्रशांत कुसराम, संघटन मंत्री देविदास उराडे, सुरेश जंम्पलवार, पंकज देशमुख,पल्लवी कोटांगले ,  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments