Ticker

6/recent/ticker-posts

*संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी: वीरई चे सरपंच श्री प्रदीप वाढई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*



जीवनदास गेडाम
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस ची झालेली पीछेहाट संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात आता घरून निघत आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेस जिल्ह्यात विखुरल्या गेली होती. त्यामुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ मंडळी सुद्धा इतर पक्षात धाव घेत होती. आता मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व संतोष सिंह रावत यांच्या कडे असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील सर्व गावातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून, पक्षाचे ध्येय धोरण समजावून, पक्षामध्ये समाविष्ट करण्याचे कार्य सुरू आहे.
आज दिनांक 1 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर मूल तालुक्यातील वीरई या गावातील सरपंच श्री. प्रदीप वाढई यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री प्रमोद गेडाम, शशिकांत जंगटे, बंडू शेंडे इत्यादींनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते माननीय संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, शहर अध्यक्ष श्री. सुनील शेरकी, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. रुपाली संतोषवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, संचालक शांताराम कांबळे, किशोर घडसे, बंडूभाऊ गुरनुले, माजी नगरसेवक विनोद कांबडे, सौ. ललिता फुलझेले, यांचेसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments