Ticker

6/recent/ticker-posts

*🎟️चेक्क फुटाना येथे युवकांना "फिट इंडिया" प्रशिक्षण*



पोंभुर्णा:- तालुका प्रतिनिधी
      पोंभूर्णा तालुक्यातील चेक फुटाणा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर च्या वतीने युवा कल्याण व सकारात्मक जीवन शैली आणि फिट इंडियावर युवकांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
     आजचे युवक उद्याचे भविष्य आहेत युवकांच्या सर्वांगीण विकासावर व देशाच्या भविष्यावर आपले योगदान कसे देता येईल व भविष्यात शिक्षण धोरण कसे असायला हवे याचे अभ्यासपूर्ण वर्णन मार्गदर्शकांनी केले.
     याप्रसंगी सरपंच जयश्री अर्जुनकर, उपसरपंच ईश्वर पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा गोरकर, लोकेश झाडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा चे मेश्राम, श्रीकृष्ण महाविद्यालय चे दुर्गे,नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे शुभम एम कोसंकर उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष व तरुण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments