Ticker

6/recent/ticker-posts

*शरदचंद्र पवार कला महिला महा.येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* 💐चामोर्शी:- सुखसागर झाडे.



चामोर्शी:- सुखसागर झाडे.

स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात जागतिक दिनाचे औचित्य साधुन मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.
देशात, राज्यात कुठेही महिला मागे नाहीत. प्रत्येक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आहे. प्रत्येक ठिकाणी त्या कणखरपणे कार्यरत आहेत. या देशात यमराजाच्या  तावडीमधून स्त्री आपल्या पतीला जिवंत आणू शकते. तर लढाईत दुश्मनाच्या पत्नीला बंदी केल्यावर सुद्धा तिची खणनारळाने ओटी भरली जाण्याची संस्कृती होती व ती आजही जपली पाहीजे असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना प्रा. सोनी आभारे यांनी आपले विचार व्यक्त केले. 

प्रास्तविकपर भाषणात प्रा. ललिता वसाके यांनी महिलांचे पुर्वी समाजात असलेले स्थान आणि आजची महिलांनी केलेली आमुलाग्र क्रांती यांवर प्रभावी प्रास्ताविक केले. 


 आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती पाहून त्यांनी भगिनींचे कौतुक केले. तसेच आई, बहीण, पत्नी नसेल तर प्रगतीस बाधा निर्माण होते. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे कोणतीतरी महिला असतेच. त्यामध्ये आई, बहीण, पत्नी यापैकी कोणीही असू शकते.असे प्रतिपादन प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. 

 शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात कार्यरत महिला कर्मचारी यांचे प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरवसन्मान करण्यात आला.
  यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments