Ticker

6/recent/ticker-posts

*🎟️अविस अध्यक्ष बानय्या जनगाम यांचेकडून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत*


*🎟️अविस अध्यक्ष बानय्या जनगाम यांचेकडून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत*
सिरोंचा प्रतिनिधी
     तालुक्यातील रामांजपूर  येथील शेखर राजाराम चिंटूला यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तेरवी चा कार्यक्रम आयोजित केला मात्र चिंटूला कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तेरवी कार्यक्रमासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानया जनगाम यांनी आर्थिक मदत केली.
       याप्रसंगी आविस शहर अध्यक्ष रवी सुलतान,आविस चे सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, युवा कार्यकर्ता गणेश रचावार, सुरेश पगडपल्लीवार, प्रशांत येलपुला,जक्कूलू नल्लाबुग्गा, किसन चिंटूला, श्रीशैलम् दामारकुंठा,रामलू अंबादास व आविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments