Ticker

6/recent/ticker-posts

’त्यांनी’ त्यांचं ठरवलंय, आपण आपलं ठरवू या ! - ज्ञानेश वाकुडकर, लोकजागर



•••
१० मार्चला ५ विधानसभांचे निकाल लागणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेशचे निकाल काय लागतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यावरूनच देश, लोकशाही, तुम्ही, आम्ही सर्वांचे भवितव्य ठरणार आहे. 

२०२४ची लढाई अगदी स्पष्ट आहे - एकतर तुम्ही लोकशाही वाचवा, अन्यथा ’ते’ तुम्हाला दिवसाढवळ्या गोळ्या घालतील ! युपी मॉडेल त्याचा जिवंत पुरावा आहे! बलात्कार झालेल्या तरुणीचे प्रेत रातोरात पोलिस जाळून टाकतात- घरच्या लोकांना कळवत नाहीत, हा प्रसंग आठवा. पेशंटचे जीव वाचवण्यासाठी ऑक्सीजन मागणाऱ्या डॉक्टरला जेलमध्ये टाकले जाते- नोकरीवरून काढले जाते, यापेक्षा आणखी कोणते पुरावे आपल्याला हवे आहेत ? गंगेच्या पाण्यावर तरंगणारी प्रेतं आठवा. आंदोलनात शेतकऱ्यांच्या अंगावर खुद्द मंत्री पुत्राने घातलेली गाडी, त्यात ४ शेतकऱ्यांना चिरडून मारणे आणि तरीही लगेच त्याची झालेली जमानत आठवा. पुलवामा हमला, ३०० किलो आरडीएक्स तिथपर्यंत पोचणे, ४४ सैनिकांचे शहीद होणे आठवा. तरीही त्याची चौकशी न होणे हेही आठवा. २६ जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी भाजपा हस्तकाची गाडी सरळ लाल किल्ल्यामध्ये घुसणे, वेगळा झेंडा फडकवणे आणि लगेच भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणे आठवा. सोशल मीडियामुळे लगेच त्याची पोल खुलणे आणि त्याच सूत्रधाराचा कार अपघातात धक्कादायक मृत्यू होणे, हा सारा घटनाक्रम नीट आठवा. या साऱ्याचा अर्थ नीट समजून घ्या. आणि शुद्धीवर राहून विचार केला, तुम्ही- आम्ही त्यांच्या नजरेत किड्या मुंग्यापेक्षा जराही महत्त्वाचे नाही, हे लक्षात ठेवा. उगाच कुठल्या भ्रमात किंवा गुर्मीत असाल, तर ते सारे डोक्यातून काढून टाका.

या संदर्भात मी आतापर्यंत माझ्या आकलनाप्रमाणे जी काही मांडणी करत आलो, त्याचा सारांश असा -
• युपी मध्ये भाजपचा दारुण पराभव होणार. 
• गोवा, पंजाब, उत्तराखंड मध्ये काँग्रेस बाजी मारणार. 
• समजा चुकून युपी मध्ये भाजपचे सरकार आलेच, तरीही योगी मुख्यमंत्री असणार नाहीत.
• समजा योगी मुख्यमंत्री झालेच किंवा नाही झालेत, तरीही ते मोदी, शहा यांचा बदला घेण्यासाठी सदैव डूख धरून असणार. ते त्यांना सोडणार नाहीत. 
• सध्या संघ योगीच्या बाजूने आहे. ती संघाची मजबुरी आहे. अंतर्गत बाबतीत संघ आजवरच्या त्यांच्या १०० वर्षांच्या इतिहासात कधीही अशा केविलवाण्या परिस्थितीत आलेला असेल, असे वाटत नाही.
• या निकालानंतर मोदी - शहा, विरुद्ध संघ अशी लढाई आणखी तीव्र होईल. 
• पण समजा युपीमध्ये भाजपा सत्तेत आलीच, तर योगी आणि संघ यांचे काही खरे नाही. पण सत्ता गेली तर ’मोदी हटाव’ मोहिमेला गती येईल. (तशी ती आतल्या आत सुरू झाली आहे. संघ त्यात सहभागी आहे.)
• युपी किंवा अन्य राज्यांच्या निकालाबाबत माझा अंदाज चुकुही शकतो. तसे झाले तर नक्कीच वाईट वाटेल. काय होते ते उद्या कळेलच. पण इतर जी निरीक्षणे आहेत, ती मात्र देश, लोकशाही, तुम्ही आणि आम्ही यांच्यासाठी जास्त चिंताजनक आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी नम्र प्रार्थना आहे. 

मला जे दिसले, वाटले ते लिहिले. अनेक मित्रांना ते आवडणार नाही, याची कल्पना आहे. पण त्याला माझा नाईलाज आहे. ज्यांना आवडेल त्यांनी मात्र शेपटी घालून बसू नये. लोकशाहीच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे, रस्त्यावर यावे, किंमत मोजायला तयार राहावे, हीच आजची गरज आहे, हीच काळाची हाक आहे. 

’ते’ देश तोडायला निघाले आहेत, अधिकृतरित्या लोकशाही संपवायला निघाले आहेत! आपण लोकशाहीला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊ या! सर्वांचा देश सर्वांच्याच मालकीचा ठेऊ या..! २०२४ ही शेवटची संधी आहे ! 

हिम्मत हारू नका.. गुलामी स्वीकारू नका !

तूर्तास एवढंच..

जय भारत ! जय लोकशाही !!
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988
•••
• लोकजागर हे एक मिशन आहे. ते समजून घेण्यासाठी 'समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत' हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या. 
• पुस्तकांसाठी संपर्क - 9503144234 (माहिती साठी किंवा पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट पाठविण्यासाठी ह्या नंबरवर व्हॉट्स ॲप करावा.)
• फोन पे साठी - 9822278988 ( या नंबरवर पैसे पाठवावे )
• किंमत - २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••
टीप - माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 
•••
संपर्क - 
लोकजागर अभियान
• 8446000461 • 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116

Post a Comment

0 Comments