Ticker

6/recent/ticker-posts

*जुनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी: मान्यवरांची उपस्थिती*




पोंभुर्णा :तालुका प्रतिनिधी

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जुनगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ पाल व शिवछत्रपती मंडळ जुनगाव यांच्या अथक परिश्रमातून या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शिवसेना,भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी या सर्वांनी मिळून या गावात राजांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत जूनगावचे उपसरपंच राहुल भाऊ पाल हे होते तर उद्घाटक म्हणून सरपंच सौ. पुनमताई राहुल चुधरी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपतालुका प्रमुख व माजी सरपंच तथा पत्रकार जीवनदास गेडाम  गजानन जी एलपुलवार तंटामुक्त अध्यक्ष, माजी सरपंच सौ इंदिरा ताई नागापुरे, प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग पाटील पाल, ग्रामपंचायत सदस्य विश्वेश्वर नानाजी भाकरे, पोलीस पाटील कानोजी पाटील भाकरे, नागेश भाऊ, राहुल भाऊ पाल, खुशाल जी पाल, खुशाल भोयर, ज्येष्ठ नागरिक तुळशीराम पाटील पोरटे,माजी ग्रामपंचायत सदस्य विलास गेडाम, ग्रामपंचायत सदस्य तेजू रंगारी, माधुरी प्रकाश झबाडे, बाळू जी पोरटे ज्येष्ठ नागरिक, चरणदास भाकरे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक गजानन जी पाल, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ येलेकर, इत्यादी उपस्थित होते.


    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश गेडेकर, कृष्णा पांडुरंग पाल, परशुराम मांडवगडे, अतुल चौधरी, फुल्लदास पाल, कैलास पाल, अंकुश गोहने, रुपेश मांडवगडे, संदीप मांडवगडे, प्रमोद चुधरी, किरण पाल, भागीरथ चुधरी, भोजराज चुधरी, अक्षय चिंचोलकर, महेश पाल, पुनाजी चुधरी, कृष्णा कुद्रूकवार, नितेश तिवाडे, संदेश वाळके, स्नेहल खोब्रागडे, जगदीश चौधरी, भारत पाल, सचिन पाल, बाबी झाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.







     जयंती कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर महाराजांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व समारोप करण्यात आला.


Post a Comment

0 Comments