Ticker

6/recent/ticker-posts

*शिवधर्म स्थापनेच्या भितीनेच शिवरायांना अल्पायुष्यात प्रस्थापित शोषकांनी संपवले* (छ.शिवरायांच शिवधर्म स्थापनेचं अधूरं राहिलेलं कार्य मराठा सेवा संघाने पूर्ण केलं) - *रामचंद्र सालेकर*



    - *रामचंद्र सालेकर*

(सिंदोला येथील शिव जयंती महोत्सव व्याख्यानात प्रतिपादन)

    दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सिंदोला गाव येथे शिवजयंती महोत्सव समिती सिंदोला द्वारा हरिश ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली शिवचरीत्रावरील झाॕकियाॕ,भजण,नृत्ये,पोवाडा,लेझीम,तथा शिवचरित्रावरील व्याख्यान इ.विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारा कोवीड 19 चे सर्व निर्देश पाळून शिवजयंती महोत्सव अती उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून रामचंद्र सालेकर राज्यउपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र हे लाभले होते, सामान्यजन अनभिज्ञ असलेले शिवचरित्रातील अनेक सत्य पैलू उलघडून अस्सल शिवचरित्र आपल्या दिड तासाच्या व्याख्यानात त्यांनी प्रस्तुत केलं.
   या प्रसंगी बोलतांना मनुवादी इतिहासकारांनी छ.शिवरायांना कशाप्रकारे धार्मिक तथा दैववादी प्रस्तुत करुन त्यांचे महान कर्तृत्व संविण्याचा कसा प्रयत्न केला हे भवानी तलवार,रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा,गुरु रामदास,गोब्राम्हण प्रतिपालक,हिंदुंचे राजे,तिथी नुसार जयंती, आदी इतिहास कसा खोटा लिहिल्या गेला, शिवरायांनी दैववाद,अंधश्रद्धा, कर्मकांडाला ठोकरुन कशाप्रकारे स्वराज निर्माण केले, प्रस्थापितांनी छ.शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी राज्यभिषेकापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत कसा त्रास दिला व त्यांचे खरे दुष्मन कोण होते हे सप्रामाण उदाहरणाद्वारा स्पष्ट केले.
  आपल्या महान प्राचीन निसर्गपुजक सिंधु बळी शिव संकृतीचा इतिहास सांगतांना ते म्हणाले की,आर्यांच्या आक्रमनाने आपल्या या महान मातृसत्ताक निसर्गपुजक संस्कृतीची नायीका असलेल्या स्त्री ला गुलाम करुन पुरुषप्रधान निसर्ग विध्वंसक यज्ञ संस्कृती आपल्यावर कशाप्रकारे लादण्यात आली.याला विरोध करणाऱ्या शंकर बळी पासून संत तुकाराम शिवरायांपर्यंत आपल्या महापुरुषांना कसे संपविण्यात आले, आपल्या या महानायकांप्रती बहुजनांच्या अपार श्रद्धेचा फायदा उठविण्यासाठी त्यांच्या दुष्मनांनीच त्यांचे विदृपिकरण करुन देव करुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेवून आपलं शोषण करणारी बंदिस्त व्यवस्था कशी निर्माण केली याचे प्राचीन दाखले देवून स्पष्ट केले.
   पुढे त्यांनी शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला आपला खरा धर्म शिवधर्म असून शिव म्हणजे शंकर हा बहुजनांचा लोक कल्यानकारी नागवंशीय आदर्श राजा, शिव पार्वती हे आपल्या या मुळ अवैदिक अनार्य संस्कृतीचे आद्य पुरुष म्हणूनच हडप्पा मोहेंजदारो उत्खननात मंदिर नाही तर फक्त शिवाच्या मुर्ती सापडलेल्या आहे.आपल्या महान प्राचीन सिंधु बळी शिवसंस्कृतीचे सच्चे वारस छत्रपती शिवराय होते.ते आपल्या प्रत्येक आज्ञापत्राची सुरुवात 'श्री शंकर' लिहूनच करत, त्यांच्या मावळ्यांचा जयघोष 'हर हर महादेव' हाच होता. छत्रपती ची मान्यता व राजदंड प्राप्त होण्यासाठी वैदिकांडून सर्व अपमान सहन करुन पहिला राज्याभिषेक ६ जुन १६७४ ला करुन घ्यावा लागला.  छत्रपती होताच छ.शिवाजी महाराजांनी  वैदिक पद्धतीच्या राज्यभिषेकात झालेल्या अपमानाचा बदला राजदंड हाती येताच अवघ्या तीन महिण्यांनी २४ सप्टेंबर १६७४ ला निश्चलपुरी गोसावी बहुजन पुरोहिताकरवी अवैदिक पद्धतीने दुसरा राज्यभिषेक करुन घेतला होता.हा दुसरा राज्यभिषेक म्हणजे शिवधर्म स्थापनेची नांदी होती. थोडं अधिक आयुष्य छ. शिवरायांना लाभल असतं तर शिवाजी महाराज आपला खरा प्राचीन सिंधु बळी शिवसंस्कृती चा निसर्गपुजक मातृसत्ताक शिवधर्म स्थापण करणार हे नक्की होते. या धाकानेच मनुवाद्यांनी शिवरायांना अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात विष प्रयोग करुन  संपवले. त्यांच हे अधूर राहिलेले कार्य मराठा सेवा संघ तथा प्राच्यविद्या पंडीत थोर विचारवंत तत्वज्ञ इतिहास संशोधक आ.ह. साळुंखे सर,पुरुषोत्तम खेडेकर साहेब....अशा अनेक विचारवंतांनी शिवधर्म  स्थापनेचं शिवरायांच राहिलेलं अधुर कार्य मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टीवर मातृत्वाचं परमोच्च शिखर असलेल्या माॕ.जिजाऊ ना शिवधर्माच्या प्रेरणास्थानी ठेवून १२ जानेवारी २००५ ला शिवधर्माचे प्रकटन करुन शिवधर्म गाथा आचरणासाठी सर्वांना उपलब्ध करुन दिली व भारताला छ.शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचा खरा मार्ग दाखविला असे प्रतिपादन केले.
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवजयंती महोत्सव समिती सिंदोराला सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
-------------


Post a Comment

0 Comments