Ticker

6/recent/ticker-posts

*🎄बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारा आरोपी वन विभागाच्या जाळ्यात*

*🎄बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारा आरोपी वन विभागाच्या जाळ्यात*


चंद्रपूर: जिल्हा प्रतिनिधी,

    वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी विदर्भात सक्रिय असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.अशाच एका प्रकरणात बिबट्याची नखे, दात आणि मिशा या अवयवांची तस्करी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला नागपूर व भंडारा वन विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.रंगनाथ शंकर मातेरे असे या आरोपीचे नाव असून तो बोरगाव, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. वनविभागाच्या पथकाने त्याच्याकडून बिबट्याच्या एकवीस मिशा, एकशेवीस नखे, आणि एकोणवीस दात जप्त केले आहेत. यात सुळे दात यांचाही समावेश आहे.
     याबाबतीत सविस्तर वृत्त असे की भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रात सावरला या गावात या अवयवांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारावर नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार करून सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संपूर्ण अवयव जप्त करण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments