Ticker

6/recent/ticker-posts

*▪वृक्षारोपणाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल* *▪संरक्षीत जंगल केले उध्वस्त : पोंभुर्णा वनविभागाचा प्रताप*

*▪वृक्षारोपणाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल*

*▪संरक्षीत जंगल केले उध्वस्त :  पोंभुर्णा वनविभागाचा प्रताप*



*पोंभुर्णा /१० फेब्रुवारी.* 


 युती सरकारने संपुर्ण महाराष्ट्रात ३६ कोटी वृक्षलागवड करुन एक मोठा जागतिक विक्रम केला. वृक्षलागवड मोहिम बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवली, पण याच मोहिमेला पोंभुर्णा तालुक्यात मात्र हरताळ फासली जात आहे. वृक्षारोपणाच्या नावाखाली वनविभागाने हजारो झाडांची कत्तल केल्याची घटना पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील घोसरी उपवनक्षेत्रात कक्ष क्रमांक ५४६  मध्ये घडली आहे.
 पोंभुर्णा तालुका वनवैभवाने नटलेला आहे,शिवाय या तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर आहे.जंगलात विविध प्रकारच्या प्राण्यांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना तालुक्याचे आकर्षण आहे.हमखास वाघ  बसायच्या निमित्ताने जंगल सफारी करायला पोंभुर्णा तालुक्यात दुरदुरचे पर्यटक भेट देतात. अशातच घोसरी येथील संरक्षीत जंगलाला वनविभागानेच उध्वस्त केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
  
महाराष्ट्रात झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्न करत असतानाच शिवसेनेची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातील पोंभूर्णा तालुक्यात वनविभागाने हजारो  झाडांची कत्तल केली आहे. 
झाडे लावा, झाडे जगवा या शासनाच्या धोरणाला फाटा देत पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील संरक्षीत जंगलात झाडाची कत्तल करण्यात आली.


एकिकडे मानवी जिवनासाठी आक्सिजन ची कमतरता दूर करण्यासाठी व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपये खर्चून वृक्षारोपण करीत आहे, तर पोंभुर्णा तालुक्यात मात्र या उलट चांगले जंगल उध्वस्त केले जाते आहे. यामुळे परीसरातील पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. आधिच पावसाचे पाणी कमी प्रमाणात होते आहे. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं तोडल्या जात असल्याने पोंभुर्णा तालुक्यातील जैवविविधतेला मोठा धक्का बसु शकतो.
पोंभुर्णा तालुका हा तसा मागास भाग म्हणून गणला गेला पण युती सरकारच्या काळात या तालुक्याचा कायापालट झाला.विविध विकास कामांनी या तालुक्याचे नाव झाले.वृक्षलागवटितहि या तालुक्याने बाजी मारली या तालुक्यात जंगलाचे प्रमाण हि भरपुर आहे.वाघाच्या घटना हि या तालुक्यात घडल्या आहेत. कन्हाळगाव अभयारण्याचा काही भाग याच तालुक्यातील आहे. पण घोसरी येथील संरक्षीत जंगलाला मात्र वनविभागाने भकास केल्याचे चित्र दिसुन येत आहे.

*= वृक्ष तोड करणारा तो ठेकेदार कोण..?*

वृक्षलागवड करण्यासाठी सदर जंगल भुईसपाट करण्याचे काम वनविभागाकडून केल्या जात आहे.यासाठि मागील महिनाभरापासून रोज ५ जाॅनडियर  ट्रॅक्टर ने काम सुरू आहे. ते सर्व काम एका अधिकाऱ्याने आपल्या जवळच्याच नातेवाईकांलाच दिले असल्याचे बोलले जात आहे.त्यासाठी त्याला लाखो रुपयांची खैरात वनविभागाने वाटली आहे. अंदाजे त्याला वनविभागाने दहा लाख रुपये दिल्याची माहिती पुढे येत आहे.

*= ति वाघीण गेली कुठे..?*
घोसरी  हे संरक्षीत जंगल आहे. या जंगलात एका वाघिणीचे वास्तव्य असल्याचे आजुबाजूचे लोक सांगतात. ति आपल्या बछडे घेऊन याच जंगलात राहत होती पण् आता हे जंगल नष्ट झाल्याने ति नेमकि कुठे गेली याचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. ट्रॅक्टर घेऊन जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना या वाघिणीने माघारी फिरवले.  पण हे निर्दयी वनकर्मचारी मात्र त्या वाघिणीला त्या जंगलातून बाहेरचा रस्ता दाखविल्याने तिच्यावर आता भटकंती करण्याची पाळी आली आहे.पोंभुर्णा तालुक्यात शिकारी सक्रिय झाले आहेत. यापुर्वीही वाघाची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आळा  घालण्यासाठी वनविभाग कार्यरत असला पाहिजे, पण या जंगल नष्ट केल्या प्रकरणी मात्र त्यांची भूमिका संशयास्पद आहे.

*जमिनदोस्त झालेल्या  त्या लाखो झाडांचे नेमके काय झाले ?*

या जंगलात अनेक प्रकारची वृक्ष होती, ती वृक्ष मोठ्या डौलाने उभी होती पण आपले हित साधण्यासाठी काही वन अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी त्या जंगलावर गेली आणि या जंगलातून आपल्याला आर्थिक लाभ नक्कीच मिळेल याच एकमेव हेतुने ते जंगल जमीन दोस्त करण्यात सुरुवात झाली यात सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणावर होते या सागवान  लाकडांची विल्हेवाट योग्य रित्या लावण्यात आली त्याचा मोठा लाभ या अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाल्याची माहिती आहे. उर्वरित आडजात लाकडे हि ट्रॅक्टर बैलगाडी ने विकल्या गेल्याचे  बोलल्या जात आहे. आजही त्या ठिकाणी हजारो झाडे पडुन आहेत तर त्यांचाही विल्हेवाट लावण्याची तयारी मोठ्या जोमाने सुरू आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*= *= पोंभुर्णा तालुक्यात घोसरी येथील संरक्षीत जंगलात वनविभागाने लाखो झाडांची कत्तल केली, यामुळे त्या जंगलातिल वन्यजीव भरकटला गेला. वाघाचा भ्रमणमार्ग बदलला यामुळे वन्यजीव हे गावा शेजारी येऊन मानवी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वन्यजीवांच्या शिकारी होण्याचा प्रयत्न होऊ शकतो यामुळे या वृक्षतोड प्रकरणात दोषी असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा*



*=अविनाश कुमार वाळके=*
वन्यजीव पशुपक्षी प्रेमी,पोंभूर्णा. 
=================================
संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बिना कामाची झाडे कापून त्यावर ती मोठ्या प्रमाणात फळे आणि ऑक्सिजन देणारी झाडे लावणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments