Ticker

6/recent/ticker-posts



;-चामोर्शी: सुखसागर झाडे

   सेवार्थ फाऊंडेशन नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेषित कार्य सैदव करीत आहे. आज दि. २६/०२/२०२२ ला सेवार्थ फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यानं करीता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.
विद्यार्थी फक्त शिक्षणातचं नाही तर खेळ क्षेत्रात सुद्धा आपले भविष्य घडवावू शकतो या अनुषंगाने विद्यार्थांसाठी ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे सुप्त गुण दडलेले असते त्या गुणांना वाव मिळावी म्हणून सेवार्थ फाऊंडेशन हे नेहमीच विविध स्पर्धेचे आयोजन  करत असते. यावेळेस सेवार्थ फाऊंडेशन
जि .प. उच्च प्राथमिक शाळा वाघोली. ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे सेवार्थ फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांन करीता दिनांक 26/02/2022 रोजी शनिवार ला सकाळी 9:00 वाजता. हि स्पर्धा 1 ली ते 7 वी पर्यंत च्या विद्यार्थी करिता आयोजित करण्यात आली होती. 

 यावेळी उद्घाटक म्हणून शा.व्य.समितीचे अध्यक्षा जयश्री ताई पोरटे प्रमुख पाहुणे सरपंच सोनी ताई किरमे , गावातील पोलीस पाटील गेडाम साहेब, ग्रा.प. सदस्य राहुल उराडे  मनोज पोरटे तसेंच जि.प. शाळेतील मुख्याध्यापक पिपरे सर, पाल सर, चहारे सर, भैसारे सर, राठोड सर, कडाम मॅडम तसेच सेवार्थ फाऊंडेशन कडून इंद्रजित सातपुते, नितीन मानकर,राहुल महाकुलकर, रत्नसागर  तलाश,मयूर ,पियुष,सचिन,अविनाश, कुनाल, दर्शन, महेश, प्रफुल आकश आदी गावातील युवा वर्ग  तसेंच गावकरी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होताच लगेच बक्षीस वितरण सुध्दा करण्यात आले.


Post a Comment

0 Comments