Ticker

6/recent/ticker-posts

*जिवती नगरपंचायत वर राॕष्ट्रवादी काॅंग्रेस - काँग्रेस आघाडीचा झेंडा - नगराध्यक्ष पदी कविता आडे तर उपाध्यक्षपदी डाॕ.अंकुश गोतावळे यांची निवड *


 

( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती :-  मागील दोन आठवड्यापासून चर्चेत असलेल्या जिवती नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे वरोरा यांच्या अध्यक्षतेखाली तर नगरपंचायत जिवती मुख्याधिकारी पिदूरकर यांच्या उपस्थित गुरूवारी पार पडली. यात राॕकाच्या कविता गजानन आडे यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश गोतावळे यांची निवड झाली.
               जिवती नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरिता सर्वाधिक १२ नगरसेवक असलेल्या राॕका-काँग्रेस आघाडीचे राॕकाच्या कविता गजानन आडे यांनी नामांकन दाखल केले होते त्यात १२ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या गोंगपाच्या लक्ष्मीबाई भिमराव जुमनाके यांना ५ मते मिळाली ७ मतांनी त्यांचा पराभव झाला.उपाध्यक्ष पदाकरिता काँग्रेसकडून डॉ.अंकुश गोतावळे यांनी नामांकन दाखल केले होते त्यांना १२ मते मिळाली तर गोंगपाकडून जमालुददीन शेख यांनी नामांकन दाखल केले होते. त्यांना ५ मते मिळाली त्यांचा उपाध्यक्ष पदाच्या निवडीत ७ मतांनी पराभव झाला.

राष्ट्रवादी काॅग्रेस - काँगेसकडून जल्लोष रॅली
_________________________
जिवती नगरपंचायतीची नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयापासून तर तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढून जल्लोष साजरा केला.


Post a Comment

0 Comments