Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या आंदोलन कर्त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा कामगार नेते मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांचा व इतर कामगार संघटना व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने मदतीचा हात*

*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या आंदोलन कर्त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा कामगार नेते मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांचा व इतर कामगार संघटना व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने मदतीचा हात*
🟩🟨🟧🟥🟦🟦
चंद्रपूर (१० फेब्रुवारी २०२२ )
      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत काम करणा-या कर्मचा-यांच्या काही मागण्यासाठी व महामंडळाचे शासकिय उपक्रमात विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रमुख मागणीसाठी मागील १०० पेक्षा जास्त दिवसापासून बैठा आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनामुळे डबघाईस आलेल्या कौटुंबिक परिस्तीथीमुळे काही आंदोलन कर्त्यानी आत्महत्यासुध्दा केल्या त्यामुळे हे आंदोलन "दुखवटा आंदोलन " म्हणून निर्धाराने सुरूच आहे. एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचे हे आंदोलन महाराष्ट्र राज्यभर आगारांच्या ठिकाणी सुरू आहे. आंदोलन कर्त्यांच्या आंदोलनाकडे शासनाने पाठ फिरविली आहे व सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ठ झालेले आहे. मासिक वेतनाअभावी आंदोलन कर्त्यांच्या कुटूंबाची आबाळ होत आहे, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणात अडचण निर्माण होत आहे. तसेच कौटूंबीक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. अशा दैन्यावस्थेतील कर्मचा-यांच्या मदतीला संवेदनशिल कामगार नेते मा. श्री. नरेशबाबू पुगलिया धावून गेले व त्यांनी बल्लारपूर पेपर मील, अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगढ सिमेंट, एसीसी सिमेंट व स्टील प्लॅट, धर्मेलपावर स्टेशन येथील इंटक प्रणित कामगार यूनियन आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अन्य-धान्याच्या २०० किट्सचे ( तांदूळ, कणिक, दाळ, तेल, साखर व अन्य साहित्यासह) वाटप करून मदतीचा हात दिला. त्यांना मदतीचा हात दिला त्यात चंद्रपूर आगार, राजूरा आगार,  वरोरा आगार, चिमूर आगार व ब्रमहपुरी आगार मधील आंदोलन कर्त्या कर्मचा-यांचा समावेश आहे.



चंद्रपूर आगाराच्या परीसारतील आंदोलन कर्त्यांच्या मंडपात संपन्न झालेल्या किट्स वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आदरणीय नरेशबाबू म्हणाले, एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी १०६ दिवसापासून आपल्या हक्कासाठी अत्यंत जिद्दीने, निर्धाराने व जराही न डगमगता आंदोलन सुरू ठेवले आहे त्याबद्दल आंदोलनकर्ते कौतुकास पात्र आहे. महामंडळाचे शासकिय उपक्रमात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीबद्दलचा प्रस्ताव न्याय प्रविष्ठ असून न्यायालयाने त्यासाठी त्रिसदस्यीय समितीची निर्मिती केली असून त्या समितीचा अहवाल येत्या दोन-तिन दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे. पुढे दिलासा देतांना बाबूजी म्हणाले, कि आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे
आणि म्हणूनच न्यायालयाचा निर्णय हा तुमच्या आंदोलन कर्त्यांना दिलासा देईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आंदोलन काळात आपण आपले धर्ये ढासळू देऊ नका. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहो.आजची ही मदत अल्प आहे. आम्ही पुढेही तुम्हाला मदत करत राहू अशी ग्वाही देऊन आंदोलनाच्या यशाची आशा व उमेद निर्माण केली.
त्यानंतर स्वहस्ते नरेशबाबुजीनी व युनियनच्या पदाधिका-यांच्या हस्ते किट्सचे वाटप केले.
याप्रसंगी श्री गजानन गावंडे गुरुजी, अँड.अविनाश ठावरी, चंद्रपूर जिल्हा इंटकचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर पोडे, कामगार नेते श्री वसंत मांढरे व श्री विजय बोरगमवार यांची प्रसंगोचित भाषणे झाली. मंचावर सर्वश्री नगरसेवक श्री अशोक नागापूरे, चंद्रपूर शहर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, श्री सुधाकरसिंग गौर, श्री तारासिंग कल्सी, श्री क्रीष्णन नायर, श्री रामदास वाग्दरकर, श्री विरेन्द्र आर्य, श्री अनिल तुगीडवार, श्री सुभाष माधनकर, श्री गजानन दिवसे, श्री अमोल हलदर, श्री करमरकर, श्री खाडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments