Ticker

6/recent/ticker-posts

गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेस -शिवसेना सत्तारूढ ! गोंडपीपरि नगरपंचायत मध्ये घडला चमत्कार : केवळ दोन नगरसेवक असताना उपनगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा अविरोध विजय



जनवार्ता भारत डॉट कॉम


गोंडपिपरी-

नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती(खुला) राखीव होते.काँग्रेस ७,भाजपा ४,शिवसेना,२,अपक्ष२,राष्ट्रवादी २ असे पक्षीय बलाबल होते तर दोन अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.नगराध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन दाखल झाले त्यात काँग्रेस कडून सविता कुळमेथे ,भाजपातर्फे मनीषा मडावी,रा.कॉ कडून सविता चंदेल.बुधवारी राकॉच्या चंदेल यांनी माघार घेतली.काँग्रेस-भाजपात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होती.लढतीत ११ ,६ ने काँग्रेसच्या सविता कुळमेथे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या सारिका मडावी अविरोध निवडून आल्या.


 यावेळी जलोश साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राजुरा अरुण धोटे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार ,सुरेश चौधरी,अशोक रेचनकर,संजय माडुरवार, नगरसेवक अनिल झाडे,यादवराव बांबोडे,सुनील संकुलवार,मनीषा देवगडे, रंजना रामगिरकार,सचिन चिंतावार,वनिता वाघाडे,शारदा गरपल्लीवार,सुरेश चिलनकर यांच्यासह काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार,शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, खेमचंद गरपल्लीवार,राकेश पुन,सरपंच देविदास सातपुते,शैलेश बैस,अशपाक कुरेशी,विवेक राणा,तुकाराम झाडे, बळवंत भोयर,बालू झाडे,अजय माडुरवार,रवी साखलवार,गौतम झाडे,यु कॉ तालुका अध्यक्ष संतोष बंडावार,बालू फुकट ,जितेंद्र गोहणे रमेश नायडू,बब्बू पठाण,आनंदराव गोहणे ,नितेश मेश्राम यांच्यासह शेकडो कॉंग्रेस व शिवसेना समर्थकांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments