Ticker

6/recent/ticker-posts

*आज 18 फेब्रुवारी रोजी होणारी नांदगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजणार! घरकुलांचा मुद्दा ऐरणीवर*




*✍️विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी*
      मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीत खो-खो चा खेळ सुरू असल्याचे जाणवत आहे!विकास कामे बाजूला ठेवून जनसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे सोडून येथील विद्यमान व तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्याविरोधात एकामेकांच्या कुरापती काढल्या शिवाय दुसरं काहीही करताना येथे दिसत नाही. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक भ्रष्टाचार त्याबाबतीत बाबी उघडकीस आल्या, परंतु त्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने व कलगीतुरा यामुळे त्या तिथल्या तिथेच जिरल्या.
      मुख्यत्वेकरून येथील घरकुलाचा मुद्दा ऐरणीवरच असून मागील वीस वर्षापासून या गावात एकही घरकुल मंजूर झाले नाही ही एक शोकांतिका आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी होणारी ग्रामसभा याच मुद्द्यावर गाजणार असे बोलल्या जात आहे. 100 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना यापूर्वीच्या ग्रामसभेने यादीला मंजुरी दिली होती परंतु त्यात कुठे माशी शिंकली हे कळले नाही.आज होणाऱ्या ग्रामसभेत या सर्व लाभार्थ्यांची निवड होणार असल्याचे बोलल्या जात असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. किंबहुना ग्रामपंचायत आणखी कोणता तीर मारते याकडेही गाववासीयांच्या नजरा लागल्या आहेत.




Post a Comment

0 Comments