Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत नांदगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

*ग्रामपंचायत नांदगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*




नांदगाव: प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत नांदगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त ध्वजारोहन सरपंच वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कोविड काळात कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या नांदगाव येथील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर व मॅजिक बस संस्थेचे समन्वयक यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकंदरीत 11 कर्मचाऱ्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.


     कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच सागर भाऊ देऊरकर तथा संपूर्ण शाळांचे मुख्याध्यापक, सीडीसीसी बँकेचे व्यवस्थापक, ग्रामपंचायतीचे सदस्य गण व पंचायत समिती मुल चे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर आणि गावकरी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.यानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.






Post a Comment

0 Comments