Ticker

6/recent/ticker-posts

वढोली येथिल युवकाचा फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह: आत्महत्या की हत्या गुढ कायम*

*वढोली येथिल युवकाचा फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह: आत्महत्या की हत्या गुढ कायम*






*(जुनगाव)पोंभुर्णा*
कामानिमित्य चंद्रपूर, पडोली येथे गेलेल्या तरूणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.मात्र त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत असले तरी लागलेल्या तरुणाचे पाय पूर्णपणे जमिनीला टेकलेले आढळून आले होते.त्यामुळे पोलिसांनी घटनेच्या तळाशी जाऊन सखोल चौकशी केली तर या प्रकरणाचे सत्य बाहेर येईल.


     शुभम पुंडलिक चुदरी ( वय 23 ) असे आत्महत्या केलेल्या यूवकाचे नाव आहे.तो गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथिल रहीवासी होता.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. शुभम पुंडलिक चूधरी हा पडोली लगत असणाऱ्या खुटाळा गावात केशव बोरकुटे या मामाकडे राहत होता. पडोलीत एका भंगार वाल्याकडे तो कामाला जायचा. चार दिवसांपासून तो बेपत्ता होता.बेपत्ता असल्याची तक्रार  पडोली पोलीसात दाखल करण्यात आली होती.अश्यातच दि २३ ( रविवार )  चंद्रपूरातील लालपेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सूरक्षा भिंतीलगत असलेल्या झाडाला  गळफास घेतलेल्या अवस्थेत शुभमचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.आत्महत्या की हत्या अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी योग्य चौकशी केल्यास सत्य बाहेर येणार, दरम्यान वढोलीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

Post a Comment

0 Comments