Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️* *🔹 मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे*.

*▪️ राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️*


राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️*
*🔹 मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे*. राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️* *🔹 मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे*.
          *🔹 मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे*.🔹
         " सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मते विकण्याची वस्तू नाही. ती आपले संरक्षणाची साधनशक्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो  आत्मघातही आहे. मते विकून नालायकांची खोगीरभरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. स्वतः नालायक व अपात्र असून पैशाचे जोरावर कायदे मंडळावर जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आमिष दाखवतील, दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावी की काय असा मोह उत्पन्न होईल.
       अशा कोणत्याही मोहास तुम्ही बिलकुल बळी पडू नका. मोहास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा पाडून घ्याल ही धोक्याची सूचना मी आज सर्वांना देत आहे. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा अट्टाहास करतो. अशा नालायक माणसाकडून समाजहिताची अगर राष्ट्रहिताची कार्य होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात सभासद म्हणून गेला, तर तो द्रव्यवाल्या लोकांचेच हितसंरक्षण करील व तो आपल्यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व तसे तुम्ही करणार नाही अशी माझी खात्री आहे."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   ( संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१,पान नं. ४६६)
           दि.२९  मार्च १९३६, "ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे" पहिले अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी झाले, त्यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन -आयु. प्रशांत चव्हाण सर.
      १९१९ साली साऊथब्युरो कमिशन पुढे साक्ष देऊन आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या  बाबासाहेबांना " राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त" विनम्र अभिवादन💐💐💐

Post a Comment

0 Comments