Ticker

6/recent/ticker-posts

रात्री शिट्टी वाजवू नये असे काही लोक का म्हणतात?


*रात्री शिट्टी वाजवू नये असे काही लोक का म्हणतात?*



पूर्वी गावाकडे घराजवळ आजूबाजूला जंगल असायचे. घरामध्ये शौचालय नसायचे. तसेच पाण्याची विहीर किंवा झरा किंवा धरण थोड्या दूर अंतरावर निर्मनुष्य अशा ठिकाणी असायचे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव रात्री घराबाहेर पडायचे झाल्यास शिट्टीमुळे निशाचर प्राण्यांचे संकट आपसूकच स्वतःवर ओढवले जाण्याचा धोका अधिक असायचा.

काही वेळेस रात्रीच्या प्रवासातून दरोडेखोरांचा धोका व्हायचा. त्यामुळे जुने लोक त्यांचा पुढच्या पिढीला चार अनुभवाच्या गोष्टी सांगताना रात्री शिट्टी वाजवू नये असे सांगायचे. हे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीला जाई.

सध्या शहरात असताना रात्रीची शिट्टी वाजवणे त्या दृष्टीने धोकादायक नाही. परंतु एखाद्या परस्त्रीसमोर वाजवली असता तोही गुन्हा ठरू शकतो. तेव्हा जरा जपून. हो एकांतात असताना किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये असताना बिनधास्त वाजवा.

बरे या शिट्टीचा उपयोग मोठमोठ्या गुप्तहेरांनी सांकेतिक इशारे करण्यासाठी केलेला आहे असे इतिहास सांगतो. आणि बऱ्याचदा या मोहीम रात्रीच्याच असायच्या.

Post a Comment

0 Comments