Ticker

6/recent/ticker-posts

जिवती नगरपंचायत वर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा


 

जिवती नगर पंचायत वर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता

भाजपा ला भोपळा पण फोडता आला नाही...

चंद्रपूर: प्रतिनिधी

जिवती नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलाश राठोड यांनी आपली सत्ता राखली आहे. जिवती नगर पंचायत मध्ये काँग्रेसने ६ जागा व राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिवती नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील १२ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या असून भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही.

Post a Comment

0 Comments