*🥤पोंभुरण्यात बीजेपीची घरवापसी तर शिवसेनेला प्रथमच एन्ट्री*


 तालुका प्रतिनिधी

        नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला असून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे गृह क्षेत्र मानल्या गेलेल्या पोंभुर्णा येथे भाजपाने आपली सत्ता कायम ठेवत सतरा पैकी दहा जागेवर विजय मिळवत नगरपंचायतीत घरवापसी केली आहे.

      प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा शिवसेना पक्ष चार जागा जिंकून आपली दमदार हजेरी लावली आहे.शिवसेनेने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती आणि स्वतः जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व  पक्षाचे अन्य नेते पोंभुरण्यात काही दिवस तळ ठोकून होते. याचा फायदा मात्र शिवसेनेला झाला आणि शिवसेनेने आपली दमदार उपस्थिती दर्ज केली आहे.याउलट चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे पालक मंत्री असून सुद्धा तालुक्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या गटबाजीमुळे या निवडणुकीत काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.तर प्रथमच निवडणुकीत उडी घेणारा वंचित बहुजन समाज पक्ष दोन जागा जिंकून त्यांनी ही आपली हजेरी लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र निराशाच हाती मिळाली आहे.

       भाजपला एक हाती सत्ता मिळाली असली तरी सत्ता स्थापन होत पर्यंत भाजपने आपल्या तंबूतील उमेदवारांना सकुशल ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा जेवणाच्या ताटावरून ताट हीसकावल्यासारखे होईल, याचेही भान राजकारण्यांना ठेवणे गरजेचे आहे.आणि ते ठेवणार आहे यात शंकाच नाही.