Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


जुनगाव प्रतिनिधी


      मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी च्या हद्दीतील चक दुघाळा येथील अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असलेल्या एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी च्या सुमारास घडली.


शोभाताई लोमेश खोब्रागडे वय पंचवीस वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोभाताई या मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजाराने त्रस्त होत्या. या विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुढील तपास ठाणेदार सतीश सिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली परचाके मेजर, जुमनाके मेजर, आनंदराव तितरमारे, गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments