Ticker

6/recent/ticker-posts

मुलांना संपवून आपलीही जीवन यात्रा संपवली l suicide l Chandrapur l

वरोरा शहराला लागून असलेले बोर्डा हे गाव आहे, शालिमार ट्रेडर्स च्या मागील बाजूस प्रतीक गॅस एजन्सी बोर्डा या परिसरात संजय श्रीराम कांबळे त्याची पत्नी व त्यांची दोन मुले किरायाच्या खोलीत राहत होते. संजय हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता तर त्याची पत्नी सविता ही सिद्दीविनायक डी फार्म कॉलेजला प्रयोगशाळा परिचर या कत्रांटी पदावर कार्यरत होती.

२२/९/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास संजय कांबळे याने अस्मित कांबळे (७) आणि मिस्टी कांबळे (४) या दोन्ही चिमुकल्याना विष पाजले व दार बंद करून तो घरून पसार झाला. आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून होती व त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. आईने आरडाओरड सुरू केली असता. काही नागरिकांनी दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र तोपर्यन्त दोन्ही मुलांची प्राणज्योत मावळली होती.

चिमुकल्यांना ठार केल्यावर संजय घरून पसार झाला होता, 3 सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास समुद्रपूर गावातील साखरा येथील शेतशिवारात संजय चा मृतदेह आढळुन आला, संजय ने विष प्राशन करीत आत्महत्या केली असे प्राथमिक अंदाजानुसार माहिती समोर आली आहे.

संजय हा खाजगी शिकवणी घेत होता, मात्र कोरोना आला आणि संजयच्या आयुष्यात अडचणी येऊ लागल्या, शिकवणी 2 वर्षासाठी बंद झाल्या, कोरोना ओसरला असला तरी त्यानंतर शिकवणी वर्गात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली. या सर्व गोष्टींचा संजयच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम होऊ लागला. मनात चिडचिड होऊ लागली. संसाराचा गाडा पुढे नेणार कसा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, मात्र संजयच्या पत्नीने वरोरा येथील महाविद्यालयात कंत्राटी पध्द्तीने नोकरी करून परिवाराला आर्थिक आधार दिला. मात्र संजयच्या मनात वेगळंच होतं. 2 सप्टेंबर

ला संजय ने दोन्ही मुलांना विष पाजलं, व त्यानंतर दोघांचा गळा आवळून खून केला. आर्थिक विवंचनेत फसलेल्या संजय ने मुलांना का मारलं? हा प्रश्न संजय यांच्या आत्महत्येने अनुत्तरित राहिला, उच्च शिक्षित असलेल्या संजय ने असं टोकाचं पाऊल उचलल्याने त्याची पत्नी एकटी पडली, संजय ने मुलांना व स्वतःला संपवित संपूर्ण कांबळे कुटुंब उध्वस्त केले.

Post a Comment

0 Comments