Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण - मुख्य आरोपींसह संशयीतांच्या नार्को टेस्टची मागणी स्प्राऊट्स EXCLUSIVE l Mumbai l



स्प्राऊट्स EXCLUSIVE

मुंबई: नवी मुंबईतील चर्चमध्ये काही मुलींचे लैंगिक शोषण झाले, आतापर्यंत यातील फक्त एकाच आरोपीला अटक झाली, मात्र या प्रकरणात या संस्थेमधील सर्वच ट्रस्टी व इतरही बडे मासे गुंतले आहेत, अशी शक्यता 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रामधील नवी मुंबई भागातील सीवूड हे शहर. या शहरातील एनआरआय हा पॉश एरिया. या एरियामध्ये 'बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट'च्या मालकीचे चर्च आहे. या चर्चची ट्रस्टी मंडळी ५ ते ६ वर्षांपासून बालवस्तीगृह चालवायची आणि तेही बेकायदेशीरपणे.

साधारणतः ३ ते १८ वयोगटातील मुला- मुलींचे लैंगिक शोषण येथे केले जायचे. यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विविध संस्थांमधून ही मुले आणली जायची. त्यांचा वापर हा प्रामुख्याने लैंगिक शोषण व कोट्यवधी रुपयांचे फंड्स मिळवण्यासाठी केला जायचा. मानवतेच्या दृष्टिकोनातून या ट्रस्टला भरपूर देणग्या मिळायच्या. मात्र ५ ऑगस्ट रोजी महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या बालवस्तीगृहावर धाड टाकली व ४४ मुलांची सुटका केली .

या ४४ मुलांपैकी १३ मुली आहेत व इतर सर्व मुले आहेत. यापैकी ४ मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी तक्रार समोर आली व त्यानंतर काही दिवसांनी यातील मुख्य आरोपी पास्टर राजकुमार येसूदासन याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

लैंगिक शोषणाचे हे प्रकरण ५ ते ६ वर्षांपासून चालू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी येसूदासन याला जरी अटक करण्यात आलेली असली, तरी या संस्थेचे ट्रस्टी मंडळींचाही या कुकर्मात सहभाग असला पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यायला हवी.

या बालवस्तीगृहातील बरीचशी मुले ही काही दिवसांतच हे वसतिगृह सोडून जायची, त्याचा शोध घेतल्यास असे अनेक लैंगीक शोषणाची प्रकरणे पुढे येवू शकतील. या संस्थेला काही बाहेरील संस्था मुले पाठवायची, या संस्थांचीही त्वरित चौकशी करण्यात यावी, मात्र सध्यस्थितीत पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे. त्यामुळेच बाकी संशयित आरोपींची साधी चौकशीही होत नाही. 

"'बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेच्या मालकीच्या सर्व बेकायदेशीर आश्रमशाळा व बालवस्तीगृह यांची सखोल चौकशी करण्यात यावी. इतकेच नव्हे तर या संस्थेची नोंदणीही त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुंबईच्या पोलीस कमिशनरांना भेटून केली आहे." 
सागर चोपदार, 
हिंदू जनजागृती समिती 

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

Post a Comment

0 Comments