Ticker

6/recent/ticker-posts

▪️बिलकीस बानो केस संदर्भात भद्रावती येथे एक दिवसीय धरणा आंदोलन l Chandrapur l Maharashtra l




▪️ माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित..


भद्रावती - ( ) : बिलकीस बानो या महिलेवर झालेल्या गॅंगरेप (सामूहिक बलात्कार) व तिच्या परिवारातील ७ जणांची निरगृहन हत्या तसेच तिच्या ३ वर्षाच्या चिमुकली मुलीचे दगडाने ठेचून अमानवी हत्या करणारे हत्यारे दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी मोकाट सोडून देण्यात आले.

*विशेष म्हणजे गुजरात राज्य सरकार म्हणते की या नराधमांची कारागृहात वागणूक चांगली असल्यामुळे त्यांना सोडण्यात आले.*
*या समाजकंटक, नराधमांना मोकाट सोडल्यामुळे संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.*
*देशभरात निदर्शने, निषेध, मोर्चा, आंदोलनाद्वारे या ११ नराधमांना फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे या एकमुखी मागणी साठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे.*
*भद्रावतीत ही "नराधमांना फाशी झालीच पाहिजे" या मागणी साठी येथील माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व व्हर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटी या सामाजिक संघठना ने सर्व राजकीय पक्ष, महिला संघठना, इतर सामाजिक संघठना, संविधान प्रेमी संघठना, युवा संघठना, विद्यार्थी संघठना, व्यापारी संघठना, ऑटो रिक्षा संघठना आणि कामगार संगठना यांना आंदोलनाची तयारी करण्यासाठी हाक दिली होती.* *या हाकेला "ओ" देऊन लोकमत सखी मंच तर्फे (सौ.सुनिता खंडारकर) आम आदमी पार्टी (श्री.सोनल पाटील) भीम आर्मी (श्री.शंकर मुन) B.R.S.P (श्री.विकास दुर्योधन) शिवसेना , भारतीय कम्युनिस्ट पार्टी (श्री.राजू गैनवार) ई.पक्ष/सामाजिक संघटनेचे प्रतिनिधित्व करून आंदोलन करण्यासाठी पाठिंब्यासह प्रत्यक्ष सहभाग घेऊन जोरदार विरोध व आंदोलन करण्याची तयारी दर्शऊन सामाजिक बांधिलकी जपली.
जर अन्य संगठना या आंदोलनात स्वयं स्फूर्तिने सहभागी होऊ ईच्छीत असेल तर त्यांचे स्वागत आहे.
*त्यानुसार प्रशासनाची परवानगी मिळताच भद्रावती सुद्धा बिलकीस बानो प्रकरणावर लवकरच रस्त्यावर दिसणार असल्याची माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष / संस्थापक मा डॉ. अविनाशभाऊ सकुंडे सदेब, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कैलास दादा पठारे , राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा. सौ. जयश्रीमाई सावर्डेकर मॅडम , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. तुळशीराम हनुमानजी जांभुळकर व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मा. सौ शिल्पाताई बनपुरकर मॅडम यांच्या वरिष्ठांच्या आदेशाने एक दिवशीय धरणा आंदोलन भद्रावती येथे. करण्याची तयारी सुरू केली आहे. आयोजक महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ सल्लागार (श्री.नागेंद्र चटपल्लीवर) महा.प्रदेश कार्याध्यक्ष (श्री.दिपक नागपुरे) महा.प्रदेश महिला संघटिका (कु.किरणताई साळवी) महा.प्रदेश महिला उपाध्यक्ष (सौ.कीर्ती पांडे) चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष (श्री.सुनील रामटेके) चंद्रपूर जिल्हा महासचिव (श्री.जितेंद्र गुलानी) चंद्रपूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख (श्री.विजयानंद सपकाळ) भद्रावती शहर अध्यक्ष (श्री.सारफराज खान पठाण)यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.*

Post a Comment

0 Comments