Ticker

6/recent/ticker-posts

लावलेले शुभेच्छा बॅनर चोरीला जाणे ही बाब निंदनीय- रश्मी पेशने l banner l hordings l cutout



ब्रह्मपुरी: नगरपरिषदच्या नगराध्यक्ष रीताताई दीपक उराडे व दीपक उराडे यांनी गणेश उत्सवानिमित्ताने चौकामध्ये शुभेच्छा बॅनर लावलेले होते ते बॅनर दिनांक 4 सप्टेंबर च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने ब्रह्मपुरी शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे नगराध्यक्षांनी नाव न घेता काही विरोधकांवर टीकेची झोड केली होती त्यापैकी ज्या कोणी चोरट्याने शुभेच्छा बॅनर चोरून नेले असेल अशा चौकात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाच्या वतीने चेक करून दोशींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या सचिव रश्मी पेशने यांनी केली आहे. तसेच ही बाब गंभीर व निंदनीय असून अशा कृत्याचे रश्मी पेशने यांनी जाहीर निषेध सुद्धा केला आहे.

Post a Comment

0 Comments