Ticker

6/recent/ticker-posts

ZP teacher l pombhurna l chandrapur l मुख्यालयी न राहणाऱ्या जुनगाव येथील जिल्हा परिषद शिक्षकांची गोची आणि फजिती



पोंभुर्णा/प्रतिनिधी
मुख्यालयी न राहता मुख्यालयी राहण्याचे खोटे दाखले सादर करून प्रशासनाच्या डोळ्यात झोकुन 25 ते 30 किलोमीटर अंतरावर वास्तव्यास राहून शाळेवर ये जा करणाऱ्या शिक्षकांची आता मात्र पुरामुळे चांगलीच फजिती व गोची झालेली आहे.

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या विळख्यात वसलेल्या जुनगाव येथे जिल्हा परिषदेची एक ते सात वर्गापर्यंतची शाळा आहे. या शाळेला "मॉडेल स्कूल" म्हणूनही तालुक्यात ओळखले जाते असे शिक्षकांचे म्हणणे आहे. आता मॉडेल स्कूल म्हणजे काय हे त्यांनीच ठरवावे! मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी "झेंडा गीत" कसा म्हणावा हे सुद्धा आजपर्यंत शिक्षकांना शिकवता आले नाही, हे या शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचेही दुर्दैव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी 15 ऑगस्ट ला ही बाब येथील माजी सरपंच व शिवसेना उप तालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी लक्षात आणून दिली असता पावसामुळे त्या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष केंद्रित झाले नाही.
13 ऑगस्ट रोजी केवळ या शाळेवर दोनच शिक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे की काय त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य "घर घर तिरंगा" या अभियानाची जनजागृती सुद्धा केलेली नाही. 12 ऑगस्ट रोजी "हर घर तिरंगाा" अभियानाचे महत्त्व गावात पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली निघेल ही पालकांची अपेक्षा होती. मात्र शाळेवर शिक्षकच दोन असल्यामुळे हा कार्यक्रमही झाला नाही. 
गावातून रॅली काढली तर शिक्षकच उपस्थित नसल्याचे नागरिकांना लक्षात येईल, आणि ते प्रश्न विचारतील म्हणूनच की काय! त्यांनी ही रॅली काढली नसावी अशी चर्चा आहे.
नऊ ऑगस्ट पासून जुनगाव इतर गावाच्या संपर्का बाहेर आहे. काही दिवस शिक्षक नावे वर बसून शाळेवर येत होते. मात्र यावेळी पूर अवाढव्य असल्याने नाव सुद्धा टाकण्यास पोलीस विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे गंगापूर मार्गे काही किलोमीटर पायी चालत येऊन जवळपास 65 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून, ते शाळेवर उपस्थित होत आहेत. शाळेवर येण्याचा वेळ मात्र अननियमित आहेे. बारा वाजता एक वाजता शाळेवर येऊन शाळा भरवल्या जात आहे. 

नऊ दिवस या गावाचा संपर्क खंडित असल्यामुळे या गावातील किराणा दुकानातील साहित्य सुद्धा संपलेले अनेक नागरिकांच्या घरच्या सिलेंडर गॅस संपलेल्या आहेत.खाण्यापिण्याच्या व औषध पाणी व इतर गोष्टीही या गावात भेडसावत आहेत. 

पशुधनावर अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आरोग्यावरही पुराचा परिणाम होत असून अनेकांच्या घरी आरोग्याच्या समस्या उद्भवलेले आहेत. या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे.मात्र प्रशासनाच्या वतीने कुठलीच उपाययोजना आतापर्यंत केली नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत.


नऊ ऑगस्ट ते आज 17 ऑगस्ट पर्यंत एका तरुणाचा व एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला, तर दोन महिलांना सर्पदंश झाल्याने त्या आताही दवाखान्यात उपचार घेत आहेत. काल एका तरुणीला झालेल्या सर्पदंशामुळे एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी बोटची व्यवस्था करून सदर तरुणीला उपचाराकरिता दवाखान्यात पाठवण्यात आले.

Post a Comment

0 Comments