Ticker

6/recent/ticker-posts

l vainganga news l pombhurna l*⭕हास्य कवी रमेश माहूरकर यांचे दुःखद निधन*


स्वर्गीगीय रमेश माहूरकर
====================
पोंभुर्णा:प्रतिनिधी,
हास्याचे फवारे उडवणारा, विविध वेशभूषा करून प्रत्येक उत्सवात सहभागी होणारा, दंडार असो की नाटक माइक मधून आपली कविता सादर करणारा जुनगाव येथील "हास्य कवी" म्हणून प्रसिद्ध असलेला रमेश माहूरकर हा कवी आज आपल्यातून निघून गेला आहे.
रमेश माहूरकर (वय 70 वर्ष) हे विविध कलागुणांनी निपुण होते. त्यांनी सामाजिक नाटकात सुद्धा भूमिका बजावल्या आहेत. "साक्षात्कार","हा पिंजरा काटेरी", "सख्खे भाऊ पक्के वैरी", अशा अनेक नाटकातून त्यांनी भूमिका साकार केल्या. "साक्षात्कार" या नाटकातील दौलतराम सावकार ही भूमिका त्यांची खूप गाजली होती. आणि बरेच वर्ष चर्चिली जात होती.
ते मागील काही दिवसापासून पक्षाघात या आजाराने ग्रस्त होते. आज 29 ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान पाच वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन, मुलगी नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे जेष्ठ चिरंजीव मनोज माहूरकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments