Ticker

6/recent/ticker-posts

l school education samiti l pombhurna l Chandrapur pदेवाडा बुज. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रेवनाथ मिसार यांची अविरोध निवड


पोभुर्णा: तालुक्यातील देवाडा बुज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25/8/2022 सभेचे आयोजन करण्यात आले होते.


सदर शाळा व्यवस्थापन समितीत अध्यक्ष म्हणून रेवणनाथ बापुजी मिसार तर उपाध्यक्षपदी सरजना राजु मेश्राम यांची नव्याने अविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये सुनिल सोपनकार ,सौ पुष्पा ईटकलवार, चेतन आरेकार, सौ पोर्णिमा राऊत, सौ सुषमा वांढरे, इत्यादींची निवड करण्यात आली.


सदर निवडीसाठी तंटामुक्त अध्यक्ष अतुल चुदरी, स्थानिक पत्रकार विकास शेडमाके, साहयक शिक्षक वाल्मिक निमसरकार, विषय शिक्षक रुपेश परसावार ,प्रतिष्ठित नागरिक भोजराज मिसार, इत्यादींनी मोलाचे सहकार्य करून पाचव्या वेळी पालकात समझोता घडवून नव्याने शाळा व्यवस्थापन समितीची निवड अवरोध करण्यात आली हे विशेष!



Post a Comment

0 Comments