Ticker

6/recent/ticker-posts

l rashtra geet l swarajya saptah l कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत "स्वराज्य सप्ताह" अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!



जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने *"स्वराज्य सप्ताह"* अंतर्गत आज सकाळी ११-वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच मुख्यालयातील विभाग खातेप्रमुख यांचे उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी महापालिका मुख्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातही सकाळी-११:००-वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम करण्यात आला. सदर समूह राष्ट्रगीत गायनाचे वेळी संबंधित प्रभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

*ऑन ड्युटी अधिकाऱ्यांना अशी काम दिली तर सर्व सामान्य करदात्या मतदात्या नागरिकांची कामे कधी होणार*

*७४-वरून-५९-वरती पालिकेच्या मराठी शाळा गेल्या पण आजही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे कल्याण-डोबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्याची अमृत महोत्सव निमित्तने स्वराज्य सप्ताह घेतलेले नाही आहे का?? अशी चर्चा यावेळी सामान्य जनतेत होत आहे‌...*

Post a Comment

0 Comments