Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा क्रांती दलाची आज पोंभरण्यात बैठक, आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन




पोंभर्णा:प्रतिनिधी
आदिवासी समाजाची सामाजिक संघटना "बिरसा क्रांती दल" म्हणून उदयास आलेल्या संघटनेची आज दिनांक 31 जुलै रोजी पोंभुर्णा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.


      या बैठकीत समाजाच्या दशा व दिशा यावर चर्चा करण्यात येऊन तालुक्यातील प्रत्येक गावात बिरसा दलाची कार्यकारणी स्थापन करण्याच्या सबंधाने सुद्धा चर्चा होईल. प्रत्येक समाजाच्या संघटना कार्यरत आहेत.मात्र आदिवासी समाजात असलेल्या विविध संघटना निर्जीव झाल्या असल्याने " बिरसा क्रांती दल" या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही संघटना आदिवासींवरील अन्याय अत्याचार या विरोधात आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.


या बैठकीत तालुक्यातील आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन महेंद्र शेडमाके, वर्षा आत्राम, जीवनदास गेडाम व समाज बांधवांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments