Ticker

6/recent/ticker-posts

पत्नीसह दोन मुलांचा खून: साताऱ्यात खळबळ



सातारा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.योगिता दत्ता नामदास (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) ता. कोरेगाव, जिल्हा सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत योगिता ही दोन मुलासह वेलंग शिरंबे येथे राहत होती. तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून करण्यात आला. तर तिच्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून देण्यात आले. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदास याला ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments