Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळीचा आक्रमक पँथर:- दिपक केदार




*आंबेडकरी चळवळीत समाजरक्षणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा व तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लढवय्या पँथर म्हणजे संघर्षनायक दिपक केदार....*

अशा लढवय्या पँथर चा जन्म 05 आगष्ट 1985 ला बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सौंदाना गावात झाला. त्यांच शिक्षण बिए जर्नालिझम पर्यंत झालं. दिपक केदार हा एका सालगडी व उसतोड कामगारांचा पोरगा. घरात अठराविश्व दारिद्रय, वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा अफाट डोंगर. या परिस्थितीत कुंटुबाची जबाबदारी खांद्यांवर घेऊन ते औरंगाबाद येथे कामासाठी आले. अवघ्या कमी वयात सुद्धा कंपनीत मिळेल ते काम तर कधी सिक्युरिटी गार्ड असं करीत व्हिडीओकान कंपनीत क्याजुअल म्हणून काम केलं. हे करीत असतांना त्यांनी ग्राफिक डिझाईनर म्हणूनही काम केलं. आठ वर्षानंतर त्यांनी स्वतःचा जाहिरात प्रिन्टींगचा व्यवसाय औरंगाबाद मध्येच सुरु केला. आणी याच व्यवसासातून सामाजिक, राजकीय चळवळीची मुहर्तमेढ रोवली. चळवळीतले अनेक लोक त्यांना भेटत गेली. त्याचातला समजासाठी लढणारा बाणा बघून त्याच्यावर भारिप बहुजन महासंघाचा शाखा अध्यक्ष म्हणून पहिली जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यानी जिल्हा सचिव पदही सांभाळलं.
*तत्कालीन सरकार विरोधात एल्गार व ॲाल इंडिया पँथर सेनेची स्थापना*
या दरम्यान महाराष्ट्रात नितीन आगे हत्याकांड, सागर शेजवळ हत्याकांड घडत असतांना तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील हे होते. महाराष्ट्रात बौद्धावर, अनुसुचीत जाती, आदिवासी समुहावर अत्याचार वाढत होता. त्याच वेळेस नितीन आगे हत्याकांड परिवाराला दिपक केदार यांनी भेट दिली. आणि औरंगाबाद शहरात मोठे आंदोलन उभे केले. याच आंदोलना नंतर कोणताही स्टेज वगैरे न लावता त्याच आंदोलनातून ॲाल इंडिया पँथर सेनेची घोषणा करुन रस्त्यावरचा संघर्ष सुरु केला.

*इंदु मिल स्मारक प्रकरणात आंदोलन व अटक*
सन 2011-12 या दरम्यान इंदू मिल येथे महामानव बाबासाहेबांचे स्मारक झाले पाहिजे म्हणून व त्या इंदू मिलची जागा मिळालीच पाहिजे म्हणून औरंगाबाद येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा दिपक केदार यांनी उधळून लावली. डी. जाँन मध्ये घुसून त्यांचा दिशेने पत्रक फेकत घोषणाबाजी केली. हे आंदोलन मोठं आंदोलन होतं. या दरम्यान दिपक केदार यांना गुन्हा दाखल होऊन अटक व जेल झाला. ह्याच मागणीसाठी दिपक केदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारला होता.
*जवखेडा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडावर निवेदन फेकणे व अटक*
त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले होते. आणी त्याच वेळेस जवखेडा हत्याकांड झालं होतं. तेव्हा दिपक केदार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हाण केलं की, जवखेडा हत्याकांडाला घटनास्थळी भेट द्या. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे स्वागत घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या सभेत जवळपास सात फुट अंतरावर जाऊन जवखेडा हत्याकांड मधील तुकडे केलेले फोटो व निवेदन थोबाडावर मारण्यात आले. यात दिपक केदार यांना अटक झाली. व प्रकरणाला मोठ्या प्रमाणावर वाचा फुटली.

*मराठवाडा विद्यापिठातील आरएसएसची घुसखोरी मोडीत काढणे*
महामानव बाबासाहेबांच्या संविधानवादी विद्यापीठांत संविधान विरोधी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या आमदारांचे कार्यालय फोडण्यात आले. याच दरम्यान भाजपाने सुपारी देऊन अमितेशकुमार कमिशनरला दिपक केदार यांचेवर हल्ला करायला लावला व बंद कार्यालयात मारहाण केली. यावेळी सुद्धा दिपक केदार यांनी जेल भोगली. राज्यभर आंदोलन चिघळले आणि आरएसएसची विद्यापिठातली ढवळा-ढवळ थांबली.
*फडणवीसांच सरकार आणि वाढत्या दंगलीत दिपक केदारांची तडीपारी*
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात नाशिक, पुर्णा, सातारा या ठिकाणी दलीत अत्याचार व दंगली घडत होत्या. याचा जाब विचारण्यासाठी विमानतळांवर दिपक केदार यांनी फडणवीस यांना अडवून धरलं होतं. रोहित वेमुला आंदोलन, आंबेडकर भवन बचाव आंदोलन, राज्यव्यापी संविधान बचाव यात्रा, दलीत बचाव राज्यव्यापी आंदोलन, रवीश कुमार अभिव्यक्ती बचाव आंदोलन, नोटबंदी विरोधात आंदोलन, आंबेडकरी चळवळ बचाव आंदोलन, असे शेकडो आंदोलन त्या दरम्यान दिपक केदार यांची सुरु होती. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्ताधारी भाजपा आमदारांचे कार्यालय फोडून आरएसएसची हुकुमशाही दिपक केदार यांनी मोडीत काढली होती. या सर्व रागातून देवेंद्र फडणवीस सरकारने दिपक केदार सहित त्यांच्या दोन सहकार्यांना दोन वर्षासाठी तडीपारी केली. यात दिपक केदार यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. आंदोलन बंद करावे लागले. या बाबत कोर्टात चैलेंज केलं पण आंदोलकांना समाजकंटक ठपका मारुन तडीपारी कायम राहिली. 21 नोव्हेबर 2019 ला दोन वर्षे संपवून पुन्हा औरंगाबाद येथे डरकाळी फोडण्यास सुरवात केली.
*महाविकास आघाडी सरकार आणि वाढते जातीय अत्याचार*
महाराष्ट्रभर ॲाल इंडिया पँथर सेनेचं संघटन उभं राहत असतांना हे महाविकास आघाडी सरकार आलं. आणि खैरलांजी च्या धर्तीवर भिमराज गायकवाड हत्याकांड घडलं. या हत्याकांडाला दिपक केदार यांनी भेट दिली आणि ही घटना महाराष्ट्रभर उभी केली. हे सरकार सुद्धा मनुवादी आहे म्हणत राज्यभर दलीत अत्याचारांना वाचा फोडीत अरविंद बन्सोड हत्याकांड, विराज जगताप हत्याकांड, प्रियंका सोनोने हत्याकांड, चंद्रपूर मधील बौद्धांना डांबून मारलेली घटना, पुतळ्यांची विटंबना, राजगृह दगडफेक या विरोधात आवाज करीत आंदोलन उभे करीत आहे. हाथरस सारख्या हत्याकांड विरोधात औरंगाबाद येथे आंदोलन उभं केलं. अनुसुचीत जाती, जमाती प्रतिबंध कायदा अंतर्गत पिडीतांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या रक्षणाची भुमिका घेणे. त्यांची सांत्वना करुन मोरल सपोर्ट देणे. मातंग समाजातील शिक्षकाला मारहाण करुन नौकरीवरुन काढून टाकले होते या विरोधात केदार यांनी भुमिका घेतली व आंदोलन केले. त्यानंतर काहीच तासांत त्यांना रुजू करुन आरोपीवर गुन्हे दाखल केले. आज राज्यभर संघटन वाढले असून तात्काळ समाज रक्षणासाठी धाऊन जात आहेत.
*विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी, रेल्वे कर्मचारी व भुमिहिन कामगार, शेतकऱ्यां करीता आंदोलन*
सामाजिक न्याय विभागाचा अनुसुचीत जाती च्या विद्यार्थ्यावरील अत्याचार, रेल्वे, एसटी कर्मचारी, भुमिहिन मजूर , शेतकरी या सर्व मुद्यावर ॲाल इंडिया पँथर सेना लढत आहे. दिपक केदार यांनी भिमा कोरेगाव येथे आंदोलन उभे केले. संभाजी भिडे, एकबोटे ला अटक करण्याची भुमिका घेऊन राज्यभर आंदोलन केले. महाराष्ट्र बंद, 26 मार्च चा एल्गार यशस्वी करण्यात मोठी भुमिका बजावली आहे. दलीत अत्याचाराचे चटके, शोषण कर्त्याच्या गर्दीत गुदमरलेला दम, अन्याय अत्याचार विरोधात चिड निर्माण होऊन यातून दिपक केदार उभे राहिले आहेत.
*दलीत पँथर ने धमक दिली*
दिपक केदार यांना दलीत पँथर ने सफर होण्याची धमक दिली आहे. आज संविधान, दलीत, आदिवासी, मुस्लिम, सर्व धोक्यात आहेत. मनुवाद माणसाला गुलाम करायला निघालाय ही गुलामी नाकारण्यासाठी दिपक केदार यांचा संघर्ष सुरु आहे. बौद्धांच्या दलीत रक्षणाचा नवा अंजेडा ते राबवित आहेत.जातीच्या अंताची चळवळ तिव्र करीत आहेत. मानवतावादी, समतावादी, संविधानवादी, बहुजनवादी हा त्यांचा पाया आहे. राज्यभर तरुणांची मोठी फळी उभी करुन तरुणांच्या जन आंदोलनाची तयारी केदार हे करीत आहेत. हे आंबेडकरी चळवळीचं चौथे पर्व आहे. या चौथ्या पर्वाचा दिपक केदार व त्यांचे कार्यकर्ते हे सैनिक, आंदोलक आहेत.


Post a Comment

0 Comments