Ticker

6/recent/ticker-posts

एका जवानाने दुसऱ्या जवानावर झाडली गोळी: लगेच स्वतःवरही गोळी झाडून केली आत्महत्या!





◆एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून केली हत्या:
स्वतः वरही गोळी झाडून केली आत्महत्या◆

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली आणि स्वतःवर गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली असून सदर घटनेने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सुत्रांच्या हवाल्या नुसार मरपल्ली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले राज्य राखीव दल यातील एका जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली आणि लगेच स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. वृत्त लिहस्तोवर हत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments