Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघात:एकाच कुटुंबातील तिघे ठार



तिरोडा साकोली रस्त्यावर भीषण अपघात
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांचा रात्री भीषण अपघात झाला. रहांगडाले यांच्या चार चाकी आणि दुचाकीमध्ये वडेगाव सर्रा गावाजवळ भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीघाजणांचा मृत्यू झाला असून सभापती रहांगडाले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

प्रकृतीही चिंताजनक

सभापती चिंतामण रहांगडाले हे आपल्या चारचाकी गाडीने सर्रा गावावरून तिरोडा येथे येत असताना भरभाव चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटून रस्त्याने जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की, दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाले आहेत. तर, एका दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडी रोडच्या खाली असलेल्या शेतात पलटी झाल्याने गाडी चालक सभापती चीतामन रहांगडाले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातामध्ये मृत्यू झालेले तिघे लग्नाची तारीख ठरवून आपल्या गावी परतत होते. यामध्ये तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. लग्न ठरवून परतत असताना तिरोडा -साकोली रोडवरील सर्रा गावाच्या परिसरामध्ये हा अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकीची भिषण धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर चारचाकीमध्ये असलेले तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे गंभीर जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments