Ticker

6/recent/ticker-posts

*💥अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकाचा मृत्यू; सहाय्यक शिक्षक जखमी*

*💥अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकाचा मृत्यू; सहाय्यक शिक्षक जखमी*
अल्लापल्ली प्रतिनिधी
      दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मुख्याध्यापकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला असून सहाय्यक शिक्षक जखमी झाले आहेत ही घटना आज दिनांक 26 एप्रिल रोजी घडली.
      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम येथील धर्मराव आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मद्देर्लावार व सहाय्यक शिक्षक गौरकर हे अल्लापल्ली वरून मने राजाराम येथे आपल्या दुचाकी (क्रमांक एम एच चौतीस आर 20 94) ने कर्तव्यावर जात होते. मिरकल गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात मुख्याध्यापक किशोर मद्देरलावार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहाय्यक शिक्षक गौरकार चे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments