Ticker

6/recent/ticker-posts

चार चाकी वाहनाचा धडकेत पत्नी ठार:पती गंभीर जखमी





गडचिरोली

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या आयुष्याच्या सेवानिवृत्तीय कालावधीपर्यंत जिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या गरीब, निराधार रुग्णानच्या सेवेसाठी आपले आयुष झिजविणारी, त्यांच्यावर जीवओतून त्यांची निस्वार्थ, मनोभावे सेवा करनारी मेट्रन कल्पना चांदेकर, यांचे सोमवार दिनांक 18 एप्रिल ला रात्रौ 11.00 वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद चारचाकी च्या जोरदार धडकेत सेवानिवृत्त मेट्रन कल्पना चांदेकर या जागीच गतप्राण झाल्या असून, त्यांचे पति हे सुधा गंभीर जखमी झालेले आहेत. कल्पना चांदेकर व तिचे पती कोटगल एम.आय.डी.सी. परिसरात वास्तव्य करीत असलेल्या भाचीला भेटून रात्री अंदाजे अकराच्या सुमारास आपल्या घराकडे परत येत असताना, न्यायालय परिसर चौकात एका भारधाव मद्यधुंद फोरव्हीलर ने त्यांच्या. मोटर सायकला जोराची धडक दिल्यामुळे मेट्रन कल्पना चांदेकर या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती अपघातात गंभीर जखमी झाले .कल्पना चांदेकर यांच्या दुःखद निधनामुळे सर्वत्र हळहळ व शोक व्यक्त करण्यात येत असून , त्यांचे प्रेतावर वैनगांगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व शोक सभाही घेण्यात आली. त्यांच्या अंत्य संस्कारास गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकि्सक डॉक्टर अनिल रुढे, डॉक्टर सतीश मेश्राम, डॉक्टर मनीष मेश्राम, डॉक्टर नागदेवते, छगन कांबळे,जिल्हा परिषद सदस्य ऍड. राम मेश्राम तसेच,शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गणमान्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .धडक देणारा फोर व्हिलर चालक हा फरार असून गडचिरोलीचे ठाणेदार फरार आरोपीवर गुन्हाची नोद केलेली असून फरार आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.

Post a Comment

0 Comments