Ticker

6/recent/ticker-posts

*हजरत दुल्हेशाह बाबा दरगाह सालाना उर्स शरीफ होणार थाटात संपन्न* ( सय्यद शब्बीर जागीरदार )



( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती:-कुसळ येथील हजरत दूल्हेशाह बाबा उर्स शरीफ चे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू असून दि. १४,१५, व १६ तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत आहे. दि. १४ ला ठीक ९.  वाजता मिलाद शरीफ व कुराण खानी चे आयोजन करण्यात आले असून दि. १५ ला सायंकाळी ४ वाजता कोरपना येथील मस्जिद येथून शाही संदल गावातून गश्त  करीत कुसल येथे दर्गा शरीफ ला पोहोचून हजरत दुल्हेशाह बाबा यांच्या मजार वर  चादर चढवण्यात येईल.  या ठिकाणी दिवसभर लंगरचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ( भोजनदान) होणार आहे रात्री ९ वाजता जावेद सर राजुरा, यांचा मैफिल शमा कार्यक्रम होत आहे. तसेच दि. १६ ला गडचांदूर येथील युवक कमिटी चा शाही  संदल थेट दर्ग्यावर पोहोचणार असून मजरावर  चादर  चढवण्यात येणार आहे तसेच लंगर (अन्न प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.) रात्री ९ वाजता असलम साबरी यांचे भाचे वसीम साबरी यांची शमा मैफिल समारोह होणार आहे. आयोजकांनी वीज पाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले असून यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहे. हजरत दुल्हेशाह  बाबा कुसळ हे तीर्थ स्थळ सर्वधर्मसमभावाचे व एकतेचे प्रतिक असून या ठिकाणी सर्व क्षेत्रातील सर्व धर्मातील भक्त श्रद्धेने हजेरी लावतात. कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांनी कोरोना  चे पालन करीत बाहेरगावावरून येणार्‍या भक्तांचे गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केलेली आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांनी आपले दुकान सज्ज केले असून या ठिकाणी तीन दिवस  ऊर्स  सोहळा संपन्न होणार आहे. कमिटीच्या सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध युवक मंडळांनी आपली जबाबदारी सांभाळत आहे असे चित्र दिसते.

Post a Comment

0 Comments