Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा येथे संत गुरु रविदास महाराज जयंती साजरी





प्रतिनिधि पोंभूर्णा 

अखिल भारतीय मादगी समाज संघटना तालुका शाखा,पोंभुर्णा यांचे वतीने बुधवार ला संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी होते तर प्रमुख उपस्थीत नगरसेवक अभिषेक बद्दलवार ,बालाजी मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते  धम्मा निमगडे, पुरणदास ईप्पलवार, नारायण ढाक, गणेश जिल्हेवार  यांचे प्रमुख उपस्थितित कार्यक्रम पार पडले.
सर्वप्रथम  संत गुरु रविदास महाराज यांचे प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जगाला मानवतेचा संदेश देणारे,  "मन चंगा तो कटोती मे गंगा" हा मोलाचा संदेश देवुन पारंपारिक रुढी परंपरेविरुद्ध न्यायाने लढा देणारे रविदास महाराज यांची जयंती दरवर्षी  साजरी करुन या महामानवाचा संदेश प्रत्येक घरोघरी पोहचविण्याचे काम या समाजांनी केले पाहीजे, तसेच मादगी समाज हा अतिशय मागासलेला समाज असुन, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, समस्या  शासनापर्यंत पोहचवुन त्यांच्या प्राथमिक गरजा पुर्ण  करण्याचं काम आपण प्रत्येकांनी केलं पाहीजे यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रीत येणं गरजेचं आहे.
या कामाकरीता आम्ही सदैव तुम्हच्या पाठीशी राहुन, मादगी समाजाच्या सर्व समस्या निकाली काढु, असे आश्वासन नगरसेवक  आशिष कावटवार यांनी  दिले.
व्यासपिठावरुन बोलतांना त्यांनी शक्य झाल्यास या समाजाकरीता  सामाजिक सभागृहाचे बांधकामही मंजुर  करुन देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी पोंभुर्णा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर ईप्पलवार, संचालन रोशन येमुलवार तसेच आभार प्रदर्शन  मारोती जिल्हेवार यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments