Ticker

6/recent/ticker-posts

एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचे मरकलमेटा येथे आयोजन .



(सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती :- तालुका कृषी कार्यालय जिवती अंतर्गत मरकलमेटा या गावी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला एकत्मिक पाणलोट विकास कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाध्ये शेतीविषयी माहिती व कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती देण्यात आली . गावातील बचत गटाच्या महिलांना व पुरुषांना स्वयंरोजगार करण्याकरिता लागणारे साहित्य आणि त्या विषयी सर्व माहिती देण्यात आली.शेतपिकावर पडणारे रोग त्यावर उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर _भाऊसाहेब भराटे यांनी पाणलोट क्षेत्राबद्द्ल व जैविक शेतीविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी _मंगेश पवार . तालुका कृषी अधिकारी कु.पी एस गोडबोले , कृषी सहाय्यक एम एन राठोड , जाधव , गेडाम ,डाखरे बोरकर , व कृषी पर्यवेक्षक पी एन ढाकणे हे उपस्थित होते . या कार्यक्रमात गावातील शेतकरी,व बचत गटातील महिला, वैजनाथ सूर्यवंशी , संतोष कांबळे , किशन सूर्यवंशी , प्रभू कांबळे , बालेसाब सय्यद , मारोती कांबळे , अंगद कांबळे , अतिक सय्यद , दत्ता राजूरकर , बापूराव गायकवाड , विमलाबाई काम्ले , पिरुबाई कांबळे , कमलबाई गायकवाड , व इतर गावातील मंडळी उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments