Ticker

6/recent/ticker-posts

नरेंद्र ऊर्फ बालु सावकार नारलावर यांना मातृशोक

नरेंद्र ऊर्फ बालु सावकार नारलावर यांना मातृशोक

     विजय जाधव,प्रतिनिधी: नांदगाव
         मूल तालुक्यातील नांदगाव येथील माजी सरपंच आणि किराणा व्यापारी नरेंद्र उर्फ बालू सावकार नारलावर यांच्या मातोश्री विमल मधुकर नारलावर यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्युसमयी त्या 81 वर्षांच्या होत्या.
        त्या वयोवृद्ध महिला असल्या तरी त्यांच्यातील समाज भावना आणि सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा त्यामुळे त्यांची ओळख नांदगावातील सर्व महिलांमध्ये होती. सर्व जाती धर्माच्या महिलांचा त्या आदर करत होत्या. त्यांच्या जाण्यामुळे नांदगावातील महिलांचे मोठे नुकसान झाले असल्याचे महिलांमध्ये बोलल्या जात आहे.
      त्यांची ख्याती इतकी होती की जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी स्वतः त्यांची तिरडी खांद्यावर घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. जुनंगाव येथील वैनगंगा नदीच्या तीरावर त्यांना अग्नी देण्यात आली. त्यांच्या अंतयात्रेला खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या मागे मुलगा नरेंद्र उर्फ बालू, सून,नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मृत्यू
बाबत अनेकांनी दुखवटा व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments