Ticker

6/recent/ticker-posts

*घनोटी नंबर 2 येथे बाललैंगिक शोषण व शिक्षण जागृती कार्यक्रम*

*घनोटी नंबर 2 येथे बाललैंगिक शोषण व शिक्षण जागृती कार्यक्रम*

पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी

      देशात व राज्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने व यापासून बचाव करण्याच्या हेतूने आरोग्य संपदा या सामाजिक संस्थेने विळा उचललेला असून संपूर्ण पोंभूर्णा तालुक्यात गावा- गावात अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून जागृती करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या कार्याचे तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
       पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी नंबर 2 येथे दि.12 - 2- 2020 रोजी आरोग्य संपदा या संस्थेच्या वतीने बाललैंगिक शोषण व शिक्षण जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अनिता तेलंग,डॉक्टर दशरथ सातपुते, सीताबाई कंकलवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच यशोदा संदीप ठाकरे, माधुरी संजय मडावी आशा वर्कर, बापू जी मडावी, भाऊराव ठाकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments