Ticker

6/recent/ticker-posts

*⭕गोंडपिपरी तालुक्यातील धामण पेठ येथे अतिसराचे थैमान* *⭕८ दिवसात पाच रुग्ण दगावले* l gondpipari l Chandrapur l Maharashtra l India l



चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील धामण पेठ या गावात अतिसाराने थैमान घातले असून मागील आठ दिवसात ५ रुग्ण दगावल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभाग निद्रिस्त आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या धामण पेठ येथे मागील अनेक दिवसांपासून अतिसार या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने आतापर्यंत पाच जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.
मृतकांमध्ये विमल नेवारे वय ५० वर्ष, अनुसया सुरकर वय ४८ वर्ष, बयाबाई चिताळे ६० वर्ष, गंगाराम मडावी वय ५० वर्ष, बापूजी धुडसे वय ६० वर्ष, यांचा समावेश असून गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments