Ticker

6/recent/ticker-posts

दूषित पाणीपुरवठ्यामुळे पोंभूर्णारांचे आरोग्य धोक्यात- शहरात तापाची साथ l pombhurna l Chandrapur l Maharashtra l India l




पोंभूर्णा प्रतिनिधि-

मागील काही दिवसांपासून शहरातील हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक नळाच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.व शहरात तापाची साथ सुरु असुन प्रत्येक कुटुंबात एक तरी तापाने आहे. वारंवार नगरप्रशसाना ला सुचना व लेखी निवेदन देऊनही नगर प्रशासन सुस्त आहे.

शनिवार ला सकाळी जंतूयुक्त पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नगरसेवक विरोधी पक्ष गटनेता आशिष काववार व नगरसेवक अतुल वाकडे यांनी नगर पंचयातच्या विरोधात रोष व्यक्त केला. नगर पंचयात प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपंचयात प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी केली आहे.
शुक्रवार ला प्रभाग ४,५,७, व ९,१३ या भागात सुद्धा जंतूयुक्त पाणीपुरवठा झाल्याने गटनेता आशिष कावटवार यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर धडक देऊन पाणी पुरवठा कर्मचारी येलूरवार,व मुकरु यांना धारेवर धरले होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा तक्रारी वारंवार होत असतानाही नगर प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या भावना दुखावून संताप वाढला आहे. शहरातील अनेक नागरिकांच्या घरी जंतूयुक्त पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये लिकेज निर्माण झाल्याने होणाऱ्या दुषित व जंतूयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगर पंचयात प्रशासन याची गांभीर्याने दखल आता तरी घेईल का? असा प्रश्न विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे यांच्यासह नागरिकांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments