Ticker

6/recent/ticker-posts

swatantrach amrut mahotsav l pombhurna l जामतुकुम येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा, सरपंच भालचंद्र बोधनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण




पोंभुर्णा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. यानिमित्त देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.
जामतुकूम येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाऊस सुरू असून सुद्धा देश प्रेम नागरिकांच्या मनातून कमी झालेला दिसला नाही. आणि कधी कमीही होणार नाही याची प्रचिती आजच्या कार्यक्रमावरून आली. कितीही वादळ वारा पाऊस ऊन आला तरी स्वातंत्र्याबाबत या देशातील प्रत्येक नागरिक घाबरणार नाही, या उत्सवात तो अनेक अडचणीवर मात करून सहभागी होणारच. याची प्रचिती आज तालुक्यातील हर गावात आली. 13 ऑगस्ट पासून पावसाने उसंत दिली नसली तरी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात कसलीही कमीपणा आढळून आली नाही.
हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा जामतुकुंज येथे सरपंच भालचंद्र बोधलकर यांच्या नेतृत्वात पार पडला. ग्रामपंचायतच्या ध्वजारोहणाला सरपंच भालचंद्र बोधलकर हे उपस्थित होते. व त्यांच्या हस्ते राष्ट्राचा ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कोणतमवार सर, भंडारकर सर, साखरकर मॅडम, गौरकर मॅडम व तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिला पुरुष व बालगोपाल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता.
या कार्यक्रमानिमित्त भारतीय संविधानाची संपूर्ण माहिती उपस्थित त्यांना व विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वातंत्र्यसंग्रामातील महापुरुषांची आठवण करून देत झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला, व त्यांचा हुबेहूब पेहराव करून मिरवणूक काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments